पशुप्रेमी कोटक यांचे निधन

By admin | Published: August 15, 2015 10:49 PM2015-08-15T22:49:27+5:302015-08-15T22:49:27+5:30

प्राण्यांवर अतोनात प्रेम करून त्यांची सेवा करणारे खांदा वसाहतीतील दयालजी कोटक (७८) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून

Passionate veteran Kotak passed away | पशुप्रेमी कोटक यांचे निधन

पशुप्रेमी कोटक यांचे निधन

Next

पनवेल : प्राण्यांवर अतोनात प्रेम करून त्यांची सेवा करणारे खांदा वसाहतीतील दयालजी कोटक (७८) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने खांदा वसाहतीवर शोककळा पसरली आहे.
मूळचे गुजरात कच्छ येथील असलेले कोटक यांनी बीएआरसीमध्ये नोकरी केली. १९९९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर पूर्णवेळ पशुसेवा केली. मोकाट जनावर, त्याचबरोबर कुत्र्यांची काळजी घेणारा तरुण वृद्ध अशी त्यांची ओळख होती. खांदा वसाहतीत गोशाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. सिडकोने मध्यंतरीच्या काळात ही गोशाळा दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचा घाट घातला होता. त्याला दयालजी कोटक यांनी विरोध दर्शवला होता. याकरिता सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांबरोबरच पोलीस आयुक्तांचीही भेट घेतली होती. (वार्ताहर)

Web Title: Passionate veteran Kotak passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.