रासायनिक कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या विषारी क्रोमियमवर पेटंट, पनवेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल पालवे यांचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:31 AM2021-03-30T00:31:17+5:302021-03-30T00:31:50+5:30

डॉ. अनिल  पालवे यांना विषारी क्रोमियम (VI)चे रूपांतर करून बिनविषारी क्रोमियम (III) मध्ये  केले.  यासाठी त्यांना भारत सरकार कडून पेटंट प्राप्त झाले आहे. या  पेटंटमुळे औद्योगिक क्षेत्रातील  ज्या कंपनीमध्ये क्रोमियमचा वापर  होत आहे अशा  कंपन्यांतील जलप्रदूषणास आळा बसणार आहे. 

Patent on toxic chromium leaked from a chemical company, Panvel College Professor Dr. Research by Anil Palve | रासायनिक कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या विषारी क्रोमियमवर पेटंट, पनवेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल पालवे यांचे संशोधन

रासायनिक कंपनीमधून बाहेर पडणाऱ्या विषारी क्रोमियमवर पेटंट, पनवेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अनिल पालवे यांचे संशोधन

Next

नवीन पनवेल : टिटॅनियम डायऑक्साइड या फोटो कॅटलिस्टचा वापर जगभर होतो. परंतु, टिटॅनियम डायऑक्साइड हा फक्त अल्ट्राव्हायलेट प्रकाशाचे शोषण करतो. मात्र दृश्यमान प्रकाश टिटॅनियम डायऑक्साइडमध्ये शोषला जात नाही. या पदार्थाची ही उणीव भरून काढण्यासाठी डॉ. अनिल पालवे यांनी अल्ट्राव्हायलेट व दृश्यमान प्रकाशाचे शोषण करणाऱ्या कंपोझिटचा आविष्कार करून पेटंट मिळवले आहे.  सध्या डॉ. अनिल पालवे,  पनवेल येथील महात्मा फुले  आर्ट, सायन्स, व कॉमर्स महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. (Patent on toxic chromium leaked from a chemical company, Panvel College Professor Dr. Research by Anil Palve)

 शिरापूर, अहमदनगर, येथील मूळ रहिवासी असणाऱ्या डॉ. अनिल  पालवे यांना विषारी क्रोमियम (VI)चे रूपांतर करून बिनविषारी क्रोमियम (III) मध्ये  केले.  यासाठी त्यांना भारत सरकार कडून पेटंट प्राप्त झाले आहे. या  पेटंटमुळे औद्योगिक क्षेत्रातील  ज्या कंपनीमध्ये क्रोमियमचा वापर  होत आहे अशा  कंपन्यांतील जलप्रदूषणास आळा बसणार आहे. 

वरील प्रक्रियेमध्ये झिंक ऑक्साईड/  कॅडमियम सल्फाइड/ ग्राफीन ऑक्साईड  या कंपोझिटचा व सौरऊर्जेचा वापर करून विषारी क्रोमियमचे रूपांतर बिनविषारी क्रोमियममध्ये कमी वेळात  होण्यास मदत होते. तसेच  निर्माण झालेल्या क्रोमियम (III) घनरूप पदार्थ बनवून विलगीकरण सहज शक्य होणार आहे. वरील कंपोझिटचा वापर हा सूर्यप्रकाशात होत असल्यामुळे विजेची बचत होणार आहे. 
हे कंपोझिट बनवण्यासाठी  कमीत कमी वेळ व खर्च लागणार आहे. त्याचबरोबर अगदी कमी वेळेमध्ये विषारी क्रोमियमचे बिनविषारी क्रोमियममध्ये रूपांतर होणार आहे. अशी माहिती डॉ. अनिल पालवे व त्यांचे विद्यार्थी अजय लाथे यांनी दिली. 

Web Title: Patent on toxic chromium leaked from a chemical company, Panvel College Professor Dr. Research by Anil Palve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.