पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे
By admin | Published: July 27, 2015 11:40 PM2015-07-27T23:40:07+5:302015-07-27T23:40:07+5:30
मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे काँक्रीटीकरण केल्यामुळे नवी मुंबईकरांना गतवर्षीपेक्षा खड्ड्यांची समस्या कमी भेडसावत आहे. प्रमुख रस्ते खड्डेविरहित असले तरी अंतर्गत रस्त्यांवर
नवी मुंबई : मुख्य रस्ते व प्रमुख चौकांचे काँक्रीटीकरण केल्यामुळे नवी मुंबईकरांना गतवर्षीपेक्षा खड्ड्यांची समस्या कमी भेडसावत आहे. प्रमुख रस्ते खड्डेविरहित असले तरी अंतर्गत रस्त्यांवर मात्र खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांवर खड्डे पडून वाहतूक व्यवस्था कोलमडते. शहरातील खड्ड्यांची समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिकेने शहरातील १९ चौकांचे काँक्रीटीकरण केले आहे. यामुळे यावर्षी प्रमुख रोड व चौक खड्डेविरहित झाले आहेत. परंतु अंतर्गत रस्त्यांवर मात्र पावसामुळे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
वाशीतील सेंटर वन मॉलसमोर रोडवर खड्डे पडले आहेत. सानपाडामध्ये महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. सानपाडा ते दत्तमंदिरकडे जाणाऱ्या रोडचे डांबरीकरण करण्यात आले आहे. परंतु याठिकाणी जलवाहिनी टाकणाऱ्या ठेकेदाराने रस्ता खोदल्यानंतर चर व्यवस्थित न भरल्यामुळे रस्ता खचू लागला आहे.
याप्रकरणी शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या ठिकाणी खड्डे निदर्शनास येतील ते तत्काळ बुजविण्याच्या सूचना ठेकेदारांना देणार असल्याचे सांगितले.