निवडणुकीमुळे महापालिकेत शांतता; लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा वावरही झाला कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 02:50 AM2019-10-10T02:50:32+5:302019-10-10T02:50:53+5:30

महापालिकेच्या ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Peace in municipality due to elections; Citizens have become less involved with people's representatives | निवडणुकीमुळे महापालिकेत शांतता; लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा वावरही झाला कमी

निवडणुकीमुळे महापालिकेत शांतता; लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा वावरही झाला कमी

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून महापालिका मुख्यालयातही शांततेचे वातावरण आहे. लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा वावर कमी झाला आहे. महापौरांसह सभापतींच्या दालनातही शुकशुकाट निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची जबाबदारी असल्यामुळे अनेक विभागामधील कामकाजावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे.
नवी मुंबईमध्ये कोकणभवन, सिडकोसह अनेक शासकीय व निमशासकीय संस्थांची कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांमध्ये महानगरपालिका मुख्यालयामध्ये नागरिकांचा व लोकप्रतिनिधींचा सर्वाधिक वावर असतो; परंतु निवडणुका जाहीर झाल्यापासून मुख्यालयामधील उपस्थिती कमी झाली आहे. पालिकेच्या बहुतांश सर्व विभागांचे प्रमुख याच ठिकाणी बसत असतात. प्रत्येक महिन्याला एक महासभा,चार स्थायी समितीच्या सभा, आठ प्रभागी समिती व आठ विशेष समितीच्या सभांसह स्वच्छता व वृक्ष प्राधिकरणाची सभा मिळून तब्बल २३ सभा होत असतात. या सभांना नगरसेवक, महापौर, प्रभाग समिती सदस्य उपस्थित राहत असतात. महासभेचे कामकाज पाहण्यासाठी नागरिकही मोठ्या संख्येने मुख्यालयामध्ये येत असतात. प्रतिदिन सरासरी १५०० वाहने येत असतात. महासभा असल्यानंतर ही संख्या १७०० पर्यंत जात असते. आचारसंहिता सुरू झाल्यापासून वाहनांची संख्या ८०० ते १००० एवढी कमी झाली आहे. रोज ३०० पेक्षा जास्त नागरिक मुख्यालयामध्ये त्यांची कामे करण्यासाठी येत असतात. ही संख्या आता ७० ते ९० वर आली आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते यांना भेटण्यासाठीहीमोठ्या संख्येने नागरिक येत असतात. सद्यस्थितीमध्येयापैकी कोणीही मुख्यालयात येत नसल्याने त्यांच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे. ज्या नागरिकांचे महत्त्वाचे काम आहे तेवढेच मुख्यालयामध्ये येत आहेत.
महापालिकेच्या ६०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनेक कर्मचारी बुधवारी प्रशिक्षणासाठी गेले असल्यामुळे बहुतांश विभागांमध्ये कर्मचाºयांचीही अनुपस्थिती दिसत होती. मुख्यालयामध्ये नगरसेवक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी रोज येत असतात. प्रभागामधील कामे प्रलंबित असलेल्या अधिकाºयांना भेटून लवकर कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करत असतात. अनेक नगरसेवक स्वत:च विकासकामांच्या फाईल वेगवेगळ्या विभागांमध्ये घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत असते. प्रभागामधील ज्या नागरिकांची कामे रखडली आहेत. त्यांना घेऊनही संबंधित विभागांमध्ये नगरसेवक जात असतात; परंतु आचारसंहिता सुरू झाल्यापासून महत्त्वाचे काम असेल तरच नगरसेवक महापालिकेमध्ये येत आहेत. महापालिकेच्या सचिव विभागामधील कर्मचाºयांवर नेहमीच कामाचा ताण असतो. महिन्याला जवळपास २३ सभांची विषयपत्रिका तयार करणे. सभा झाल्यानंतर इतिवृत्त तयार करणे यामध्ये कर्मचारी व्यस्त असतात. त्या विभागामध्येही शांतता असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात शुकशुकाट
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाच्या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांमध्ये नियमित नागरिकांची गर्दी असते. शहरातील नागरिक कामांसाठी त्यांच्याकडे येत असतात; परंतु निवडणूक सुरू झाल्यापासून महापौरांच्या दालनामध्येही फारसे कोणी येताना दिसत नाही.

प्रवेशद्वारावरील कर्मचाºयांना दिलासा
महापालिकेच्या प्रवेशद्वारांवरील कर्मचाºयांना येणाºया व जाणाºया प्रत्येक वाहनाचा नंबर नोंद करावा लागतो, यामुळे दिवसभर कर्मचाºयांना दक्ष राहवे लागते. प्रतिदिन १५०० ते १७०० वाहने मुख्यालयामध्ये येत असतात. आचारसंहितेमुळे ही संख्या ८०० ते १००० झाली आहे, यामुळे या कर्मचाºयांनाही अल्पसा दिलासा मिळाला आहे.

मंजूर कामे पूर्ण करण्यावर भर
आचारसंहितेमुळे महासभा व इतर कामकाज होत नाही. लोकप्रतिनिधींचा वावरही कमी असतो, यामुळे प्रत्येक विभागामधील अधिकारी व कर्मचाºयांनी यापूर्वी मंजूर झालेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील भविष्यात करण्यात येणाºया धोरणात्मक कामांवरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आयुक्तांकडून अधिकाºयांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत.

सर्व काही शांत शांत
नवी मुंबईमध्ये सर्वात विस्तीर्ण कँटीन नवी मुंबई महानगरपालिकेचे आहे. या ठिकाणी दिवसभर गर्दी असते. अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या काही मिटिंगही कँटीनमध्येच होत असतात; परंतु निवडणूक सुरू झाल्यापासून येथे येणाºयांची संख्या खूपच कमी झाली असल्याची प्रतिक्रिया कँटीनमधील कर्मचाºयांनीही दिली आहे.

शहरात महापालिकेच्या माध्यमातून भविष्यात जी कामे करायची आहेत त्याचे नियोजन केले जात आहे. आचारसंहिता लागू होण्याआधी जी कामे मंजूर झाली आहेत, तसेच ज्या कामांची वर्कआॅर्डर देण्यात आली आहे, त्या कामांबाबत नियोजन करण्यात येत आहे. शहरात प्लास्टिकबंदीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भविष्यात काही वर्षांनंतर घनकचºयाची समस्या उद्भवू नये, यासाठी बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे. - अण्णासाहेब मिसाळ, महापालिका आयुक्त

Web Title: Peace in municipality due to elections; Citizens have become less involved with people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.