शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नाही
By admin | Published: May 13, 2017 01:21 AM2017-05-13T01:21:30+5:302017-05-13T01:21:30+5:30
पनवेल महापालिकेच्या स्थापनेला विरोध दर्शवणाऱ्या शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नसल्याची टीका आमदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला विरोध दर्शवणाऱ्या शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नसल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. खारघर शहरात २००९ पासून अनेक कामे केली असल्याचा खुलासा त्यांनी केला.
भाजपाच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस बिना गोगरी यांनी भाजपामधून बंडखोरी करीत प्रभाग ४ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ११ मे रोजी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खारघरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजपाचे जयेश गोगरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपामध्ये बंडखोरांची संख्या जास्त होती हे मान्य करीत सर्व बंडखोरांना शांत करण्यात यश आले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे नक्कीच संघटनेच्या पातळीवर पुनर्वसन केले जाईल, असे यावेळी ठाकूर यांनी सांगितले.