भारनियमनाविरोधात शेकापचा मोर्चा, तहसीलवर धडक : भारनियमनाविरोधात पनवेलमधील नागरिक आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:02 AM2017-10-14T03:02:55+5:302017-10-14T03:03:10+5:30
पनवेलमध्ये भारनियमनाला सुरु वात झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
पनवेल : पनवेलमध्ये भारनियमनाला सुरु वात झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने पनवेल तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.
पनवेल परिसरातील शेतकरी, रुग्णालय, कारखानदार वर्गाला भारनियमनाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. वीज नसल्याने सामान्यांना झेरॉक्स काढण्यासाठी दुप्पट पैसे भरावे लागत आहेत. वीज भारनियमनाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेकापचे कार्यकर्ते, महिला, ज्येष्ठ नागरिक समाविष्ट झाले होते.
गेल्या महिन्यात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खांदा वसाहत येथे जनता दरबार घेतला होता. या ठिकाणी भारनियमन करत त्यांनी पनवेलच्या नागरिकांची फसवणूक केली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. काँगे्रसच्या काळात पेट्रोल ७१ रु पये लिटर होते आज ते ८०.३५ रु पये झाले आहे. रेल्वे तिकीट २५ रु . असलेले ७५ पर्यंत वाढ झाली आहे. गॅसच्या किमतीमध्ये ३०० रु पयांनी वाढ झाली आहे. आज देशाचे सकल उत्पन्न घटले आहे. मोदी सरकारने जीएसटीसारखे धोरण आणून सामान्यांचे हाल केले आहेत, अशी टीका माजी आमदार विवेक पाटील यांनी केली.
सरकारने सत्तेत आल्यावर भारनियमन सुरु केले. एकीकडे सरकार सांगत आहे की, कारखाने येतील, गुंतवणूक वाढेल पण कारखान्यांना लागणारी वीज मात्र सरकार देत नाही. मनपा क्षेत्रात यापूर्वी भारनियमन लागू केले जात नव्हते. मात्र मोदी सरकारने याठिकाणी भारनियमन लागू करण्याचे काम केले आहे. या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे असे विवेक पाटील यांनी सांगितले.
पनवेल तहसील कार्यालयात काढण्यात आलेल्या मोर्चात आमदार बाळाराम पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, गटनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा चिटणीस गणेश कडू, तालुका चिटणीस एकनाथ भोपी, ज्येष्ठ नेते नारायण घरत, पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, आर.डी. घरत, ज्ञानेश्वर मोरे,कार्यालयीन चिटणीस जितेंद्र म्हात्रे. प म पा जिल्हा महिला आघाडी अनुराधा ठोकळ, पनवेल अर्बन को -आॅप बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका कमल कदम, प्रज्योती म्हात्रे, प्रीती जॉर्ज म्हात्रे, सारिका भगत, जॉन्सन जॉर्ज आदी मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.