हातगाड्यांनी अडविली पादचाऱ्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:45 AM2018-04-09T02:45:17+5:302018-04-09T02:45:17+5:30
शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे.
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर जागा मिळेल तेथे हातगाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात असून या गाड्यांमुळे रस्ता अडविला जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासणीच होत नसल्याने खाद्यपदार्थ विके्रते बिनधास्तपणे व्यवसाय करत आहेत. शहरातील रेल्वे स्थानक, उद्याने, बस डेपो, मॉल्स, शासकीय कार्यालयाजवळील पार्किंगची जागा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावरील पदार्थांची विक्री केली जाते.
रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्र ी केली जात असून मध्यरात्रीपर्यंत अशाप्रकारे रस्त्यावरील मुख्य परिसरातील वाट अडवून खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. हातगाड्यांवर विकल्या जाणाºया चायनीज पदार्थांमध्ये अजीनोमोटोसारख्या घातक पदार्थाचा वापर यामध्ये केला जातो. रात्रीच्या वेळी शहरातील उड्डाणपुलांच्या खालीदेखील खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या केल्याचे चित्र पहायला मिळते. या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जात नसल्याने निर्धास्तपणे खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. शहरातील सर्वच रस्त्यावर हातगाडी आणि स्टॉल लावून खाद्यपदार्थांची विक्र ी होते. सोसाट्याच्या वाºयासह वाहणारी धूळ, वाहनांमुळे उडणारी धूळ थेट खाद्यपदार्थांवर बसते. हेच पदार्थ ग्राहकांना विक्र ी होत असल्याने अनेक विकारांना आमंत्रण मिळत आहे. सीबीडी सेक्टर आठ परिसरातील विनापरवाना दूध, व दुग्धजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याविरोधात तक्रारही नोंदविण्यात आली आहे.
अशाप्रकारे परवाना नसतानाही खाद्यपदार्थांची विक्री केली असल्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहेत. तरीदेखील कार्यवाहीअभावी निर्धास्तपण पदपथावरील जागा गिळंकृत केली जात असल्याचे चित्र पहायला मिळते.
>रेल्वे प्रवासी हैराण
वाशी, नेरुळ, सानपाडा येथील रेल्वे स्थानकांबाहेर संध्याकाळनंतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून संपूर्ण परिसरातील जागा अडविली जात असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी व्यवसाय सुरु असल्याचे चित्र दिसून येते. दिवसेंदिवस विक्रेत्यांची संख्या वाढत असून रेल्वे स्थानकाबाहेरील संपूर्ण पदपथावर अतिक्रमण केले आहे. काही विक्रेते याठिकाणीच अन्न शिजवत असून उरलेला ओला कचरा देखील परिसरातच टाकत असल्याने दुर्गंधी पसरते. नेरुळ रेल्वे स्थानक तसेच सानपाडा येथील रेल्वे स्थानकांवरही अशीच काहीशी परिस्थिती पहायला मिळते. प्रशासकीय कारवाईअभावी हे विक्रेते निर्धास्तपणे व्यवसाय करत असून पादचारी, प्रवाशांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.बेलापूर कोकण भवन परिसरातील पदपथ, पार्किंगची जागा देखील बळकावली गेली असून याठिकाणी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहायला मिळते. शहरातील हे चित्र पाहून या विक्रेत्यांना हटविण्यात महापालिकेला पुरेसे यश न मिळाल्याचे दिसून येते. रेल्वे स्थानकाबाहेरील विक्रेत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून कारवाईअभावी उघड्यावरील अन्नपदार्थांच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
चायनीज पदार्थांबरोबरच शीतपेयांची विक्री केली जाते. याकरिता वापरले जाणारे पाणी, बर्फ पिण्यास योग्य नसल्याने नागरिकांना विविध आजारांचे बळी पडावे लागते. पदार्थांची विक्री करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. अनेक परिसरात कचराकुंडी शेजारी अन्नपदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरी आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित चायनिज धाब्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
>स्टेशनच्या बाहेर पडताच याठिकाणी असलेल्या विके्रत्यांमुळे मार्ग काढणे मुश्कील होते. पदपथाचा वापर करता येत नसून मुख्य रस्त्यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. संध्याकाळच्या वेळी याठिकाणी ग्राहक, खाद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रेल्वे स्थानकाबाहेर पडणे अवघड होते. ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत अशा ठिकाणी देखील बॅटरीचा वापर करून अनधिकृत स्टॉल्स चालविले जातात.
- अपूर्वा कामठेकर, महिला प्रवासी