दुष्काळग्रस्त निराश्रितांना पादचारी पुलाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:08 PM2019-06-01T23:08:04+5:302019-06-01T23:08:17+5:30
स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे.
Next
नवी मुंबई : मुंबईमध्ये आलेल्या दुष्काळग्रस्तांसह बेघर नागरिकांसाठी सानपाडा पादचारी पूल आधार बनला आहे. दिवसभर मिळेल ते काम करून १०० पेक्षा जास्त निराश्रित रात्रीच्या मुक्कामासाठी पुलाचा वापर करत आहेत.
स्मार्ट सिटीमध्ये हक्काचा निवारा नसलेल्यांसाठी सर्वोत्तम व सुरक्षित पर्याय ठरला आहे. राज्यासह देशामध्ये सर्वत्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.
रोजगारही नसल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यामुळे अनेकांनी मुंबई व नवी मुंबईकडे प्रस्थान केले आहे. शेकडो दुष्काळग्रस्तांनी सानपाडामधील उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडांवर आश्रय घेतला आहे.