पेण : पेण कृषी उत्पन्न बाजार समितीची २५ जुलै रोजी निवडणूक होत असून काँग्रेस-शिवसेना पक्षाची युती विरोधी शेतकरी कामगार पक्ष असा रंगतदार सामना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघात होत आहे. दोन्ही बाजूकडून प्रचार सुरु असून एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या ५६६ सदस्यांना मताधिकार असल्याने दोन्ही गटांचा जोरदार प्रचार सुरु आहे. काँग्रेस, शिवसेना गटाने वडखळ येथील गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. पेण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण १८ जागांपैकी ५ जागी शेकापचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. एकूण १३ जागांसाठी निवडणूक होत असून सहकारी कृषी पतसंस्था गट सात जागा, व्यापारी अडते गट दोन जागा, व ग्रामपंचायत मतदार गट चार जागा अशी विभागणी आहे. ग्रामपंचायत मतदार गटातील चार जागांसाठी वडखळ ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मी नाईक (अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग) राजेश मोकल व मिलिंद मोकल (खुला प्रवर्ग ) हे तीन उमेदवार काँग्रेस व शिवसेना पक्षाच्या युतीने दिल्याने सामना रंगतदार ठरणार आहे. आजवर कृ षी उत्पन्न बाजार समितीवर विरोधी पक्षातर्फे सदस्यच न दिल्याने ही निवडणूक डोकेदुखी ठरणार आहे.प्रचाराची रणधुमाळी - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ग्रामपंचायत मतदार संघाच्या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण केली आहे. त्यानुसार काँग्रेस, शिवसेनेची स्थानिक नेते मंडळी या प्रचारामध्ये उत्स्फूर्त सहभागी होवून १३ जुलै ते २० जुलैपर्यंत पेणच्या ६३ ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या भेटी घेण्यात येतील.
पेण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक रंगणार
By admin | Published: July 15, 2015 10:33 PM