तलवार बाळगणाऱ्यास कोपरखैरणेतून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:07 AM2019-04-01T05:07:04+5:302019-04-01T05:07:19+5:30

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई

The people who took the sword were arrested from Koparkhairane | तलवार बाळगणाऱ्यास कोपरखैरणेतून अटक

तलवार बाळगणाऱ्यास कोपरखैरणेतून अटक

Next

नवी मुंबई : अवैधरीत्या तलवार बाळगल्या प्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तो पामबीच मार्गावरील एका बारमधील आॅर्केस्ट्राचालक असून कोपरखैरणेत राहतो. तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली.

मल्लीनाथ रामण्णा राय (३३) असे अटक केलेल्या आॅर्केस्ट्राचालकाचे नाव आहे. तो कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहायला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास तो रिक्षातून तलवार घेऊन घराकडे चालला होता. दरम्यान, त्याने लपवलेली तलवार निदर्शनास येताच एका दक्ष नागरिकाने कोपरखैरणे पोलिसांना कळवले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सम्राट वाघ, पोलीस शिपाई अमृत साळी, औदुंबर जाधव, साईनाथ सोनवणे, योगेश पाटील व गणेश गीते यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरात सापळा रचला. राय हा रिक्षातून त्या ठिकाणी आला असता, त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी तलवारीबाबत चौकशी केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, बंदूक, मशीनगन आदी शस्त्रे बाळगण्यास प्रशासनाने बंदी लागू केली आहे. याआधी तळोजा, पनवेल परिसरातून गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
 

Web Title: The people who took the sword were arrested from Koparkhairane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.