महापालिका रुग्णालयांत सुरू होणार जनऔषधी केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:19 AM2019-11-16T00:19:18+5:302019-11-16T00:19:49+5:30

शहरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रु ग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

People's medicine center to be started in municipal hospitals | महापालिका रुग्णालयांत सुरू होणार जनऔषधी केंद्र

महापालिका रुग्णालयांत सुरू होणार जनऔषधी केंद्र

Next

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शहरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शहरातील महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात शहरातील गोरगरीब नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येतात. नागरिकांना स्वस्तात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालय परिसरात प्रधानमंत्री जनऔषधी विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जनऔषधी विक्री करणाºया एजन्सीसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, यामध्ये पात्र एजन्सीमार्फत केंद्र चालविण्यासाठी महापालिका रुग्णालयातील जागेच्या भाड्यापोटी दरमहा दोन लाख १६ हजार रु पये रक्कम प्राप्त होणार आहे. हा प्रस्ताव शुक्र वार, १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे. यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी, या ठिकाणी फक्त जनऔषधे असणार आहेत की इतरही औषधे असणार, याबाबत विचारणा केली. नगरसेविका सरोज पाटील यांनी, महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात अशाप्रकारची केंद्र सुरू करण्याची मागणी केली. नगरसेवक रंगनाथ औटी यांनी शहरातील प्रत्येक नोड तसेच महापालिकेच्या सर्व बालमाता रु ग्णालयात जनऔषधी केंद्र सुरू करावीत, अशी मागणी केली. नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी जनऔषधी केंद्र सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून मागणी आणि पाठपुरावा केला होता. हा प्रस्ताव स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी आल्याने आनंद होत असल्याचे सांगत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रत्येक नोडमध्ये जनऔषधी केंद्र सुरू करावे, तसेच महापालिकेच्या वर्धापनदिनी सर्व केंद्र सुरू करण्याची मागणी केली. नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी, महापालिकेचे डॉक्टर रु ग्णांना जनऔषधेच की इतर औषधे देणार, असा प्रश्न उपस्थित केला. यावर आरोग्य अधिकारी बाळासाहेब सोनावणे यांनी, जनऔषधी केंद्रात फक्त जनऔषधी उपलब्ध असणार आहेत. जनऔषधांची यादी डॉक्टरांना देण्यात येणार असून, रुग्णांनाही बाजारात उपलब्ध असलेली जनऔषधीच देण्यात येणार असल्याचे सांगितले. स्थायी समितीचे सभापती नवीन गवते यांनी वाशी येथील रु ग्णालयात सुरू होणाºया जनऔषधी केंद्रामुळे शहरातील गोरगरीब नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल; परंतु शहरातील नागरिकांना प्रत्येक नोडमध्ये जनऔषधांचा लाभ घेता यावा, नोडनिहाय केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे आदेश दिले.
।कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांच्या नेमणुका
नवी मुंबई शहरातील नागरिकांना मिळणाºया आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारावा, तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येणार असून यामध्ये कान, नाक व घसातज्ज्ञ, शल्यचिकित्सक आणि दंतशल्य चिकित्सक डॉक्टरांचा समावेश आहे. सदर डॉक्टरांच्या नेमणुका करार पद्धतीने ठोक मानधनावर करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने बुधवार, २० नोव्हेंबर रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी मांडला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर डॉक्टरांच्या नेमणुका महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहेत.

Web Title: People's medicine center to be started in municipal hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.