कर्जतमध्ये मिरचीची मोठी उलाढाल

By admin | Published: April 6, 2016 04:15 AM2016-04-06T04:15:20+5:302016-04-06T04:15:20+5:30

जानेवारी, फेब्रुवारी महिन्याची सुरु वात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे.

Pepper's big turnover in Karjat | कर्जतमध्ये मिरचीची मोठी उलाढाल

कर्जतमध्ये मिरचीची मोठी उलाढाल

Next

कर्जत : जानेवारी, फेब्रुवारी महिन्याची सुरु वात झाली की महिलांना वेध लागतात ते पावसाळ्यात लागणाऱ्या वस्तूंची साठवण करण्याचे. त्यातच यंदा विवाह मुहूर्त कमी असल्याने लगीनघरच्या महिला मंडळींना लवकरात लवकर मसाला करण्याचे वेध लागले आहेत. सध्या मिरचीच्या खरेदीसाठी कर्जत बाजारपेठेत महिलांची मोठी गर्दी दिसत आहे, या खरेदीत मोठी उलाढाल होत असते. मात्र महाराष्ट्रात विकली जाणारी मिरची महाराष्ट्रात तयार होत नाही ती महाराष्ट्राबाहेरून येते. तसेच यंदा मिरचीच्या भावात २० ते २५ टक्के भाववाढ झाली आहे.
कर्जत बाजारपेठ मिरचीच्या खरेदीसाठी प्रसिध्द आहे. या बाजारपेठेत लोणावळा, बदलापूर, कल्याण, पनवेल आदी भागातील महिला येऊन मिरचीची खरेदी करतात.
कर्नाटक, आंध्र, सोलापूर येथून मिरची विक्र ीसाठी येत असते. कर्जत बाजारपेठेत गंटुर, बेडगी, शंकेश्वरी, लवंगी, पट्टी आणि साधी मिरची येत आहे. बेडगी १८० -२२० रु पये किलो, शंकेश्वरी १६० रु . किलो, लवंगी १४०- १५० रु पये किलो, गंटुर १३०-१५० रु पये किलो, हळद १५० रु पये किलो असा दर आहे. पावसाळ्यापूर्वी वर्षभर पुरेल एवढा मसाला, हळद करु न ठेवण्यासाठी महिलांची धडपड असते.

Web Title: Pepper's big turnover in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.