विरोध धुडकावून उद्यानात जत्रेला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 01:40 AM2018-01-16T01:40:54+5:302018-01-16T01:40:54+5:30
घणसोली येथे उद्यानात जत्रेला परवानगी दिल्यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी सोमवारी पालिका आयुक्तांना धारेवर धरले. यापूर्वी त्याठिकाणी नवरात्री, गणेशोत्सवाला परवानगी नाकारणारे अधिकारी जत्रेसाठी परवानगी देतात
नवी मुंबई : घणसोली येथे उद्यानात जत्रेला परवानगी दिल्यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी सोमवारी पालिका आयुक्तांना धारेवर धरले. यापूर्वी त्याठिकाणी नवरात्री, गणेशोत्सवाला परवानगी नाकारणारे अधिकारी जत्रेसाठी परवानगी देतात, यामागे अर्थकारण असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तर नुकताच उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च झालेला असल्याने अधिकाºयांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू असल्याचाही आरोप होत आहे.
घणसोली सेक्टर ४ येथील उद्यानामध्ये जत्रा भरवण्यासाठी पालिकेने परवानगी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे उद्यानाच्या डागडुजीवर नुकताच झालेला खर्च पाण्यात गेला आहे. परिसरातील रहिवाशांसाठी एकही चांगले उद्यान नसल्याने स्थानिक नगरसेविका उषा पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार या उद्यानाची डागडुजी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आमदार निधी व पालिकेचा निधी असा सुमारे ३० लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना विरंगुळ्यासाठी चांगले उद्यान उपलब्ध झाले होते. अशातच पालिका अधिकाºयांनी सदर उद्यानात जत्रा भरवण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु परवान्यातून प्रशासनाला मिळणाºया ५४ हजार रुपयांसाठी तिथल्या ३० लाखांच्या कामांवर पाणी सोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. नागरिकांचीही गैरसोय झाल्याने अधिकाºयांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. यापूर्वी सदर उद्यानात गणेशोत्सव व नवरात्रोत्सवासाठी काही मंडळांकडून परवानगी मागितली असता, ती नाकारण्यात आली होती. व्यावसायिक उद्देशाने भरणाºया जत्रेसाठी मात्र उद्यान खुले करून सुविधांची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकारी कसे तयार होतात, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी आयुक्तांकडे तक्रार केली असता, विभाग अधिकारी व परिमंडळ उपआयुक्तांकडून हास्यास्पद खुलासा करण्यात येत आहे.
यावरून भाजपा जिल्हा सरचिटणीस कृष्णा पाटील व मनसे शहर सचिव संदीप गलुगडे यांनी स्थानिकांसह पालिका आयुक्तांना धारेवर धरले. उद्यानात जत्रा भरवल्याने यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचे नुकसान झाले आहे.