‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे यांना पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:38 AM2018-12-29T03:38:26+5:302018-12-29T03:38:58+5:30
महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत ‘लोकमत’चे छायाचित्रकार संदेश रेणोसे विजेते ठरले आहेत. सुप्रसिद्ध छायाचित्रकार अतुल लोके यांनी प्राप्त छायाचित्रांचे परीक्षण करून विजेत्यांची निवड केली आहे.
पालिकेच्या वतीने प्रतिवर्षी छायाचित्र स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये नवी मुंबईतील सर्वोत्तम छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने गतमहिन्यात केले होते. त्यामध्ये व्यावसायिक व हौशी अशा दोन गटांतून एकूण ३४ छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. पालिकेकडे प्राप्त झालेल्या छायाचित्रांमधून उत्कृष्ट चित्रांची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून अतुल लोके यांची निवड केली होती. त्यामध्ये व्यावसायिक गटातून संदेश रेणोसे, बच्चनकुमार, विवेक थोरात, नरेंद्र वास्कर, सत्यवान वास्कर यांची छायाचित्रे सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. त्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे हौशी गटातून शुभम मालाडकर, डॉ. संध्या जैन व नयन वास्कर यांच्या छायाचित्रांची सर्वोत्कृष्ट छायाचित्रे म्हणून निवड झाली आहे.