मधुकर ठाकूरउरण : उरण-पीरवाडी किनाºयाची काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. भरतीच्या लाटांनी नारळी, पोफळी, सुरुची झाडे आणि किनाºयावरील संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी समुद्र रेषेपासून दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरले आहे. वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी गावात शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तसेच पीरवाडी पर्यटन स्थळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला आहे. निसर्गरम्य वातावरण, अथांग समुद्र, किनाºयावरील लांबचलांब नजरेत पडणारी नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पीरवाडी बीच पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आला आहे. मुंबईपासून अगदी जवळच पीरवाडी बीच असल्याने दरवर्षी येथे येणाºया पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातून येणाºयांची संख्या अधिक आहे. मात्र उरण-पीरवाडी किनाºयाची अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात धूप होत चालली आहे.
भरतीच्या महाकाय लाटांनी संरक्षक बांधबंदिस्ती उद्ध्वस्त करून समुद्राचे पाणी दहा ते पंधरा मीटर अंतरापर्यंत शिरत आहे. धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने या किनाºयाची प्रचंड धूप होऊन नासधूस झाली आहे. त्यामुळे नारळी, पोफळी आणि सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. किनाºयावर असलेली स्मशानभूमीदेखील लाटांच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाली आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने उरणमधील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा पीरवाडी बीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच वेळीच उपाययोजना करण्यात आली नाही तर समुद्राचे पाणी येथील नागावात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पीरवाडी किनाºयावरील जागा खासगी मालकीच्या असल्याने नागरिकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. मात्र किनाºयाची होणारी धूप, झाडे पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने रायगड जिल्हाधिकाºयांनी याची दखल घेतली असून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही उरण तहसीलदारांना दिले आहेत.नागाव किनारा व येथील नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी धूप प्रतिबंधक बंधाºयाची गरज असल्याचा अहवाल उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी जिल्हाधिकाºयांना पाठवला आहे. मात्र त्यानंतरही अद्यापही कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी पीरवाडी समुद्र किनाºयाची होणारी धूप सुरूच असून पर्यटन स्थळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.