शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कामोठेत सिडकोच्या नावे घातले खड्ड्यांचे श्राद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 11:28 PM

कामोठे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.

कळंबोली : कामोठे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा कामोठेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यात वाहने आदळून लहान-मोठे अपघातही घडले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करूनही सिडकोकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत एकता सामाजिक संस्थेने नाराजी व्यक्त करत रविवारी सिडकोच्या नावाने रस्त्यावरील खड्ड्यांचे पूजन करून श्राद्ध घातले.हिंदू धर्मात पितृपक्षाचे महत्त्व अनन्यसाधारण मानले जाते. शुक्रवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध घातले जाते. परंतु कामोठेत सिडकोच्या नावाने रविवारी साडेअकरा वाजता गुरुजींना बोलावून खड्ड्यांचे पूजन करून श्राद्ध घालण्यात आले. याचे कारण म्हणजे वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. चालकांना आरोग्याच्या व्याधी उद्भवत असल्याचे संतोष चिखलकर या रहिवाशाने सांगितले. तक्रार केल्यावर अधिकारी येतात. पाहणी करतात आणि निघून जातात. लवकरच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल असे उत्तर अधिकारी देतात. यासंदर्भात एकता सामाजिक संस्थेने सिडको अधिकाऱ्यांना जागे करण्याकरिता अंतर्गत रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून श्राद्ध घालण्यात आले. यावेळी एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे, अल्पेश माने, सुभाष सावंत, संतोष चिखलकर, गौरव जहागीरदार, उषा डुकरे, सुशांत सुवरे, सुनील करपे आदी उपस्थित होते.