सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:38 PM2019-08-20T23:38:44+5:302019-08-20T23:39:19+5:30

शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

The planned Kharghar city is the most polluted, reports Panvel Municipal Environment Report | सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद

सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पर्यावरण अहवाल सोमवारी महासभेत मांडण्यात आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. खारघरसारख्या सुनियोजित शहरात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद नवरात्रोत्सवात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम पायदळी तुडविण्यात आले असून त्यापैकी उत्सव चौकात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद नवरात्रीत करण्यात आली आहे.
शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिका हद्दीतील भूमी वापर २४ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर गेला आहे, तर शेतजमिनीने क्षेत्र ७७.९ वरून ४६.४ टक्क्यांवर आले आहे.
तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषण लक्षात घेता, कासाडी नदीच्या स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे एस. के. कोठे यांनी व्यक्त केले आहे. तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्राला आधुनिक करण्याची गरज आहे, अन्यथा याचा फटका कासाडी नदीच्या प्रदूषणावर बसणार आहे. तर पनवेल शहरात मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. पनवेल परिसरात मे महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली असून जानेवारीत सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
अहवालानुसार, महापालिका क्षेत्रातील प्रभाग १, २, ३, २० हे सर्वात अनियोजित प्रभाग असून त्यांच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर प्रभाग १ आणि २ हे दोन प्रभाग सर्वात जास्त प्रदूषित प्रभाग आहेत. याठिकाणी उपलब्ध असणारे पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पनवेल शहराचा विस्तार लक्षात घेता, भविष्यात मोठ्या आणि विस्तृत रस्त्यांची गरज आहे, अन्यथा वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण तसेच अपघात वाढण्याची शक्यता आहे. शहरातील पाणीसमस्याही गंभीर आहे. महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात सध्या एकही निरंतर वायुप्रदूषण मोजमाप यंत्र नाही. ते बसविल्यास पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या प्रदूषणाची माहिती सर्वांना मिळू शकेल. सद्यस्थितीत कल्याण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या दरम्यान नदी, तलावांत मूर्ती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी अहवालात कृत्रिम तलावांत मूर्ती विसर्जन करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

उत्सव चौकात सर्वात जास्त प्रदूषण
नवरात्रोत्सवात केलेल्या सर्वेक्षणानुसार, पालिका क्षेत्रात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण उत्सव चौकात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीन ठिकाणच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.

पालिका क्षेत्रातील कृषी जमीन
पनवेल महापालिका क्षेत्रातील शेतजमीन ७७.९ टक्क्यांवरून ४६.४ टक्क्यांवर आली आहे. मागील तीन वर्षांत पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून शेतजमीन नष्ट होत आहे.
पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात प्राध्यापक नीरज हातेकर यांनी प्रदूषणाचा धोका लक्षात घेता पर्यावरण मित्रांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सतत वर्दळीचे महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचे काम, औद्योगिक वसाहतींतून होणारे प्रदूषण लक्षात घेता, पर्यावरण संवर्धनावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना हातेकर यांनी दिल्या आहेत.

Web Title: The planned Kharghar city is the most polluted, reports Panvel Municipal Environment Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल