शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

सुनियोजित खारघर शहर सर्वात प्रदूषित, पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:38 PM

शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील पर्यावरण अहवाल सोमवारी महासभेत मांडण्यात आला आहे. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. खारघरसारख्या सुनियोजित शहरात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद नवरात्रोत्सवात करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात सर्वच ठिकाणी ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम पायदळी तुडविण्यात आले असून त्यापैकी उत्सव चौकात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषणाची नोंद नवरात्रीत करण्यात आली आहे.शहरीकरणामुळे महापालिका क्षेत्रातील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिका हद्दीतील भूमी वापर २४ टक्क्यांवरून ५६ टक्क्यांवर गेला आहे, तर शेतजमिनीने क्षेत्र ७७.९ वरून ४६.४ टक्क्यांवर आले आहे.तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषण लक्षात घेता, कासाडी नदीच्या स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्थेचे एस. के. कोठे यांनी व्यक्त केले आहे. तळोजा एमआयडीसीमधील सीईटीपी केंद्राला आधुनिक करण्याची गरज आहे, अन्यथा याचा फटका कासाडी नदीच्या प्रदूषणावर बसणार आहे. तर पनवेल शहरात मध्यम स्वरूपाच्या प्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. पनवेल परिसरात मे महिन्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली असून जानेवारीत सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.अहवालानुसार, महापालिका क्षेत्रातील प्रभाग १, २, ३, २० हे सर्वात अनियोजित प्रभाग असून त्यांच्या नियोजनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तर प्रभाग १ आणि २ हे दोन प्रभाग सर्वात जास्त प्रदूषित प्रभाग आहेत. याठिकाणी उपलब्ध असणारे पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.पनवेल शहराचा विस्तार लक्षात घेता, भविष्यात मोठ्या आणि विस्तृत रस्त्यांची गरज आहे, अन्यथा वाहतूककोंडी, ध्वनिप्रदूषण तसेच अपघात वाढण्याची शक्यता आहे. शहरातील पाणीसमस्याही गंभीर आहे. महापालिकेने याबाबत तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात सध्या एकही निरंतर वायुप्रदूषण मोजमाप यंत्र नाही. ते बसविल्यास पालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या प्रदूषणाची माहिती सर्वांना मिळू शकेल. सद्यस्थितीत कल्याण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आदी ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाच्या दरम्यान नदी, तलावांत मूर्ती विसर्जनामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी अहवालात कृत्रिम तलावांत मूर्ती विसर्जन करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.उत्सव चौकात सर्वात जास्त प्रदूषणनवरात्रोत्सवात केलेल्या सर्वेक्षणानुसार, पालिका क्षेत्रात सर्वात जास्त ध्वनिप्रदूषण उत्सव चौकात झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तीन ठिकाणच्या सर्व्हेनुसार ही माहिती समोर आली आहे.पालिका क्षेत्रातील कृषी जमीनपनवेल महापालिका क्षेत्रातील शेतजमीन ७७.९ टक्क्यांवरून ४६.४ टक्क्यांवर आली आहे. मागील तीन वर्षांत पालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास झाला असून शेतजमीन नष्ट होत आहे.पनवेल महापालिकेच्या पर्यावरण अहवालात प्राध्यापक नीरज हातेकर यांनी प्रदूषणाचा धोका लक्षात घेता पर्यावरण मित्रांची नेमणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सतत वर्दळीचे महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळाचे काम, औद्योगिक वसाहतींतून होणारे प्रदूषण लक्षात घेता, पर्यावरण संवर्धनावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना हातेकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :panvelपनवेल