प्लॅस्टिकविरोधात महापालिकेची मोहीम सुरूच; वाशी, नेरुळ, कोपरखैरणे, बेलापूरमध्ये व्यापाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:58 AM2018-10-12T00:58:55+5:302018-10-12T00:59:27+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नवी मुंबई : प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
नेरु ळ विभाग कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी संजय तायडे यांच्या नियंत्रणाखाली सेक्टर-६ येथील दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर प्लॅस्टिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये मॉलमधील सर्व व्यावसायिकांकडून वापरल्या जाणाºया प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून ११ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार प्रमाणे दंड वसूल करण्यात आला. कोपरखैरणे विभागात सहा. आयुक्त अशोक मढवी व बेलापूर कार्यक्षेत्रात विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या प्लॅस्टिक प्रतिबंध व सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाºया दुकाने व हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई केली. कोपरखैरणेत १३ हजार, तर बेलापुरात १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. यापूर्वी वाशी विभाग कार्यक्षेत्रात नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्त कारवाई केली होती.
११ व्यावसायिकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे इनॉर्बिट मॉलमध्ये १२ व्यावसायिकांकडून ६० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आणि २.५ टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी क्षेत्रीय अधिकारी इंद्रजित देशमुख व राजेंद्र पाटील, तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे व कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक सुषमा देवधर सहभागी होते.
महाराष्ट्र राज्यात असलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर पूर्णपणे बंद करणे, तसेच बंदी घातलेले प्लॅस्टिक घटक यांची विक्र ी, साठा अथवा वापर कोणीही करू नये, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. तरीही अशा प्रकारचा प्लॅस्टिक वापर करणाºयांवर दंड व जप्तीची कारवाईदेखील करण्यात येत आहे. तथापि, प्लॅस्टिक हे आपल्याच जीवनासाठी हानिकारक आहे हे लक्षात घेऊन नागरिकांनी बंदी घातलेल्या प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.