ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम
By admin | Published: July 2, 2017 06:24 AM2017-07-02T06:24:46+5:302017-07-02T06:24:46+5:30
राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शहरातील शासकीय इमारती, शाळा-महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी वृक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शहरातील शासकीय इमारती, शाळा-महाविद्यालय परिसर आदी ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वृक्षारोपण सप्ताहांतर्गत शनिवारी वृक्ष लागवड करत वन संरक्षण, झाडे वाचवा, झाडे जगवा, वृक्षसंपत्तीचे जतन करा, असा संदेश देण्यात आला.
बेलापूरमधील बचतधाम विश्रामगृह येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमात कोकण विभागीय कार्यालयाच्या माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे उपायुक्त शिवाजी कादबाने यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी उपायुक्त मिलिंद पाठक, बापूसाहेब सबनीस, अरुण अभंग, गीतांजली बाविस्कर, सहायक आयुक्त वर्षा उंटवाल, तसेच विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
माणूस निसर्गाचे काही देणे लागतो, या भावनेतून निसर्गाचे देणे त्याला परत देण्यासाठी जुईनगर येथील शिवआधार चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांनी, शनिवारी संस्थेच्या शिवाजीनगर येथील अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांनी सायन-पनवेल हायवेच्या नेरुळ रस्त्याच्या बाजूच्या परिसरात, ‘एक तरी रोप लावू, ग्लोबल वार्मिंगमुक्त राहू,’ या उपक्रमांतर्गत बदाम, कडुलिंब, पेरू, पिंपळ अशा प्रकारची झाडे लावून निसर्ग सवंर्धनाचा संदेश दिला. या वेळी अभ्यास केंद्रातील मुलांनी स्वहाताने पर्यावरण जनजागृतीचे महत्त्व पटवून देण्याकरिता घोषवाक्यांचे फलक तयार करून, या उपक्र मा वेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश शेळके, मनोज आर्इंची, अनिकेत म्हस्के, शाकीर बागवान, गौरी जगदाळे, साजिद शेख, प्रशांत रेवेकर, साईनाथ वाघ, गायत्री जगदाळे, गणेश सकपाळ आणि शिवआधार चॅरिटेबल
ट्रस्ट अभ्यासकेंद्रातील मुले व मुली उपस्थित होते.
महापालिकेकडून ५५०० वृक्षांची लागवड
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फतही ४० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प घेण्यात आला आहे. महापालिका मुख्यालयासमोरील पामबीच मार्गाच्या एन.आर.आय. कॉलनीकडील सर्व्हिस रोडवर महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीत ताम्हण वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. ऐरोली सेक्टर-१० येथे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जी प्रभाग समिती अध्यक्ष संजू वाडे, स्वीकृत नगरसेवक मनोज हळदणकर त्याचप्रमाणे नेरूळ विभागात रेल्वेस्टेशन भागात नगरसेवक नामदेव भगत, आर. आर. पाटील उद्यानात नगरसेवक रवींद्र इथापे, छत्रपती शाहू महाराज उद्यानात नगरसेविका सुनिता मांडवे, गावदेवी मैदानात नगरसेवक गिरीश म्हात्रे, सेंट आॅगिस्टन स्कूल मैदानात नगरसेविका मीरा पाटील, सेक्टर-३ बस डेपो येथे नगरसेविका शिल्पा कांबळी, मोराज गार्डनच्या बाजूला नगरसेविका वैजयंती भगत, नाना-नानी पार्क सानपाडा येथे नगरसेविका ॅॠ चा पाटील, गावदेवी मैदान बेलापूर येथे नगरसेवक अशोक गुरखे आदी लोकप्रतिनिधींसह उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
तळोजा कारागृहात वृक्षारोपण
तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसरात आणि पांडवकडा येथेही शनिवारी हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कारागृह परिसरात कैद्यांमार्फत ५०० झाडे तर लायन्स क्लब तर्फे ५०० झाडे लावण्यात येणार आहेत. आमदार प्रशांत ठाकूर, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्र म घेण्यात आला. या वेळी तळोजा कारागृहाचे अधीक्षक एस. एन. गायकवाड, वनविभागाचे प्रादेशिक सहायक वनसंरक्षक नंदकिशोर कुपते उपस्थित होते. यावर्षी पांडवकड्यावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली असून, पुढील वर्षीपासून नाममात्र दरात येथे पर्यटकांना येता येईल. या वेळी खारघर शहरातील नगरसेवक अभिमन्यूशेठ पाटील, नीलेश बाविस्कर, शत्रुघ्न काकडे, रामजी बेरा, लीना गरड, भाजपा पनवेल तालुका ओबीसीसेल अध्यक्ष विजय पाटील, खारघर शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस गीता चौधरी, बिना गोगरी, दीपक शिंदे, समीर कदम, किरण पाटील आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची वृक्षप्रतिज्ञा
विद्या उत्कर्ष मंडळाच्या बेलापूर येथील विद्याप्रसारक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी, तसेच शिक्षकांनी सामूहिक वृक्षप्रतिज्ञा घेत वृक्ष लागवड केली. या ठिकाणी लागवड करण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांना वनांचे महत्त्व, पर्यावरण साखळी, पर्यावरण संवर्धन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील, अध्यक्ष भालचंद्र कोळी, सचिव कृष्णा कोळी, संदेश पाटील, मुख्याध्यापक साहेबराव सोनवणे, सुहास सोनटक्के, इरफान पटेल, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.