प्लास्टीक बंदीचे आदेश कागदावरच; पनवेल महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:09 AM2020-07-24T00:09:10+5:302020-07-24T00:09:16+5:30
बंदी असलेल्या साहित्यांचा सर्रास वापर
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टीकच्या वस्तू उत्पादनांवर व वापरावर शासनाने बंदी घातली आहे. परंतु पनवेल बाजारपेठ तसेच रोज बाजार मार्केटमध्ये प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. बाजारपेठेतील महापालिकेची प्लास्टीकविरोधी कारवाई थंड पडल्याने दुकानदार, हातगाडी तसेच भाजी विक्रेत्यांचे फावले आहे. दिवसेंदिवस वाढता प्लास्टीकचा वापर होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
पर्यावरणास धोकादायक ठरत असलेल्या मायक्रो पॉलिथीनच्या पिशव्या तसेच प्लास्टीकपासून बनविण्यात आलेल्या पत्रावळी, प्लेट, ग्लास आदी विक्री आणि वापरावर शासनाने २३ जून २०१८ रोजी बंदी आणली. तेव्हापासून अनेक ठिकाणी कारवाईसुद्धा केली. त्याचबरोबर पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकानांवर छापा मारून प्लास्टीक कॅरीबॅग व प्लास्टीक वस्तू वापरणाºयावर दंडात्मक कारवाई केली. त्यात विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या गोडाऊनवरसुद्धा छापा मारण्यात आला होता.
सतत कारवाई होत असल्याने पनवेल महापालिका क्षेत्रात प्लास्टीक बंदी पूर्णपणे यशस्वी झाली होती. परंतु कोरोना लॉकडाऊन काळात निर्बंध असलेल्या प्लास्टीकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेचे कर्मचारी कोविड १९ च्या कामात व्यस्त आहेत. यामुळे दुर्लक्ष आणि कारवाईला स्थगिती दिल्याने भाजीविक्रेते तसेच हातगाडीवाले कॅरीबॅगचा सर्रास वापर करताना दिसत आहेत. प्लास्टीक वापर वाढल्याने प्लास्टीक कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गटारे, नाले पुन्हा एकदा तुंबणार
च्पनवेल परिसरात प्लास्टीक कॅरीबॅगचा सर्रास वापर झाल्याने, काम झाल्यानंतर त्या कॅरीबॅग इतरत्र टाकून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर कचºयातदेखील कॅरीबॅग वाढत आहेत. च्इतरत्र फेकलेल्या कचºयाच्या माध्यमातून नदी, नाले, गटारे तुंबण्याचे प्रकार घडू शकतात. त्याचबरोबर पर्यावरणाची हानी करण्यास खतपाणी घालण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता महापालिकेकडून योग्य कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
महापालिका कर्मचारी कोविड १९ या कामात व्यस्त असल्यामुळे प्लास्टीक बंदी कारवाई थंडावली होती. पनवेल परिसरात भाजीविक्रेते, हातगाडीवाले यांच्याकडून प्लास्टीक कॅरीबॅगचा वापर सुरू असेल तर पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
-जमीर लेंगरेकर उपायुक्त, पनवेल महापालिका