पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:58 PM2019-01-30T23:58:09+5:302019-01-30T23:58:29+5:30
१० दुकानांवर कारवाई; ५० हजार रुपये दंड वसूल
पनवेल : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. दहा दुकानांची झाडाझडती घेऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.
पनवेल महानगर पालिका प्लॅस्टिकबंदी करणारी राज्यातील पहिली महानगर पालिका आहे. राज्यात देखील प्लॅस्टिकबंदी असताना पालिका क्षेत्रात छुप्या पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांची विक्र ी होत असल्याची माहिती पालिकेला प्राप्त झाली होती. या आधारे पनवेल शहरातील दुकानांवर छापे टाकत पालिकेने सुमारे १0 दुकानांकडून १५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी दिली. भविष्यात ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड देखील उपस्थित होते. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात मुंब्रा तसेच उल्हासनगर याठिकाणाहून प्लॅस्टिक पिशव्यांची आयात केली जाते. दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाºया व्यापाºयांवर देखील कारवाईची गरज आहे.