प्लॅस्टिकमुक्तीला व्यापा-यांचा हरताळ, पनवेलमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 01:56 AM2017-11-16T01:56:52+5:302017-11-16T01:57:10+5:30

प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे.

 Plastics elimination of merchandise, plastic is widely used in Panvel | प्लॅस्टिकमुक्तीला व्यापा-यांचा हरताळ, पनवेलमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर

प्लॅस्टिकमुक्तीला व्यापा-यांचा हरताळ, पनवेलमध्ये सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर

googlenewsNext

वैभव गायकर 
पनवेल : प्लॅस्टिकमुक्त पनवेल करण्याच्या मनपा प्रशासनाच्या संकल्पास व्यापाºयांनी हरताळ फासला आहे. बंदीचे आदेश धाब्यावर बसवून बिनधास्तपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आपॅरेशनमध्ये निदर्शनास आले आहे. हागणदारीमुक्तीप्रमाणे प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही संकल्पनाही फक्त कागदावरच राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी १० नोव्हेंबर रोजी महापालिका क्षेत्रामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातल्याचे जाहीर केले. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर कायद्याने बंदी आहे. परंतु सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारी पनवेल ही एकमेव महापालिका असल्याचा दावा केला होता. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांकडून ३० लाख रुपये दंड आकारण्यात आल्याची माहिती दिली होती. महापालिका प्रशासनाच्या प्लॅस्टिकमुक्तीचे वास्तव तपासण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील सर्व विभागामध्ये जावून पाहणी केली असता प्लॅस्टिकचा पूर्वीप्रमाणेच वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. पालिका मुख्यालयातील कर्मचारीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत आहेत. मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या पटेल मोहल्ल्यातील मटण व इतर विक्रेते बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीमध्ये निदर्शनास आले. उरण नाक्यावरील हॉटेल, मच्छी मार्केटमध्येही विक्रेते प्लॅस्टिकमध्येच साहित्य ग्राहकांना देत होते. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल परिसरातील भाजी विक्रेते व इतर फेरीवाल्यांनीही महापालिकेचे आदेश धाब्यावर बसविले आहेत. विक्रेत्यांना प्रशासनाची भीतीच राहिलेली नाही. प्रशासनाकडूनही ठोस कारवाई होत नाही. दिखावेगिरी करण्यासाठी काही ठिकाणी कारवाई केली जात असल्याची टीकाही होवू लागली आहे.
महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात पूर्ण मनपा क्षेत्रामध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. नागरिकांना प्लॅस्टिकला पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. व्यावसायिकांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. जनजागृती न करताच आयुक्तांनी सरसकट प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची आयुक्तांनी घाई केली. राज्यातील पहिली महापालिका ठरविण्याच्या अट्टाहासामुळे हाही प्रयोग फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फक्त कारवाई करून प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार नाहीत. त्यासाठी महानगरपालिकेला व्यापक जनजागृती करावी लागणार आहे.
भिवंडीसह उल्हासनगरमधून येतात प्लॅस्टिक पिशव्या
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. भिवंडी, उल्हासनगरमधून पिशव्या विक्रीसाठी येत आहेत. महापालिका क्षेत्रातही बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे विक्रेते आहेत. या सर्वांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
प्लॅस्टिकमुक्तीसाठी लोकसहभाग नाही
महापालिका प्रशासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घातली आहे. विक्री करणाºयांवर कारवाईही सुरू केली आहे. पण प्लॅस्टिकमुक्त पनवेल ही फक्त महापालिकेची जबाबदारी नाही. या अभियानामध्ये नागरिकांनीही सहभाग घेतला पाहिजे. नागरिकांनी स्वत: या अभियानामध्ये सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title:  Plastics elimination of merchandise, plastic is widely used in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.