शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 9:18 PM

पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत. 

ठळक मुद्देखारघर सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या कुलदीप कौर विग (६४) असे या खातेधारकाचे नाव आहे.मंगळवारी पीएमसी खातेदारांची मुंबईस्थित निदर्शन होती.

वैभव गायकर 

पनवेल - पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या आणखी एका खातेदाराचा खारघरमध्ये मृत्यू झाला आहे. खारघर सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या कुलदीप कौर विग (६४) असे या खातेदाराचे नाव आहे. सध्याच्या घडीला लाखो पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत. 

मंगळवारी पीएमसी खातेदारांची मुंबईस्थित निदर्शन होती. यासंदर्भात बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात असताना कुलदीप कौर यांनी संबंधित बातम्या बघून आपले पती वरिंदर सिंग विग यांना आरबीआय यासंदर्भात अद्याप तोडगा काढत नसल्याने आपणास आपले पैसे परत मिळतील का ? असा प्रश्न  उपस्थित केला.यावेळी वरिंदर सिंग वीर यांनी हा विषय सोडून देवून सर्वकाही देवावर आहे. असे उत्तर दिले.मंगळवारी सकाळी ११.३० च्या प्रसंगानंतर कुलदीप कौरला अस्वस्थ वाटू लागले.दुपारी दोन च्या सुमारास कुलदीप यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी कुलदीप यांना हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. बँकेत पैसे अडकल्याने कुलदीप सतत तणावात असल्याने  घडल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. कुलदीप कौर विग व वॅरिंदर सिंग विग यांना तीन मुले आहेत. यापैकी एक मुलगी अमेरिकेला असते तर दुसरी मुलगी पतीचे निधन झाल्याने विग कुटुंबियांसोबत राहत होते. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी विग कुटुंबीयांनी १५ लाखाची एफडी उघडली होती. तर उर्वरित बचत खात्यामध्ये देखील जवळ जवळ ३ लाखापेक्षा जास्त पैसे अडकले आहेत. कुलदीप यांचे पती वरिंदर सिंग विग हे जीटीबी नगरला गुरु तेग बहादूर हायस्कुलमध्ये नोकरी करतात तर मुलगा सुखबीर रिअरस्टेटमध्ये कार्यरत आहे. बॅँकेत मोठ्या संख्येने पैसे अडकल्याने विग कुटुंबीयांनी यावर्षी दिवाळी देखील साजरी केली नाही.

मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हि घटना घडल्याने मुलगा सुकबीर मानसिक धक्क्यात आहेत.शुक्रवारी कुलदीप कौर विग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरी, मुलगी अमेरिकेतून परताना दोन दिवसाला काळावधी लोटल्यावर दोन दिवसांनंतर कुलदीप कौर विग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबईHeart Attackहृदयविकाराचा झटका