कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 11:29 PM2019-09-16T23:29:32+5:302019-09-16T23:29:46+5:30

साहित्य समाजमनाचा आरसा आहे.

Poetry is a celebration of sensuality | कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

Next

पनवेल : साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले.
कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्तर-दक्षिण रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कवितांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप नेते वाय.टी.देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मास सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरु ण म्हात्रे, कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, नाटककार मोहन भोईर, उत्तर रायगड कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे तसेच अ.वि.जंगम, सुनंदा देशमुख, सुधीर शेठ उपस्थित होते.
मनुष्याचे रडणे-हसणे ही साहित्याची साधने असून बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली जाणार आहे, खऱ्या अर्थाने ही साहित्यिकांची फलश्रुती आहे, असे मत मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांनी मार्गदर्शन करताना, साहित्यिक घडण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचून कविता तयार होत नाही, त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. जितक्या स्वभावाचे लोक असतात तितक्या स्वभावाच्या कविता निर्माण होतात. सकस साहित्य कलाकृती व्हायची असेल तर अनुभूती असावी लागते. अवतीभोवती घडणाºया घटनांची साहित्यकृती निर्माण केली तर वाचकांच्या पसंतीस येते असे त्यांनी सांगितले. कवी अरु ण म्हात्रे यांनी कवितेची कुठेही शाळा नाही, कुठेही रजिस्टर नाही. कवी जो कविता सादर करतो त्याला रसिकांची दाद मिळते तेव्हा ती कविता उत्कृष्ट होते. शब्द साठा असणारे अनेक कवी आहेत. पण शब्दांपेक्षा भावनेतून कविता आली पाहिजे. काळजातून विद्रोह असला तर विद्रोही कविता निर्माण होते. कवी बनायचे असेल तर खूप कविता वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत असे सांगितले. दुपारच्या खुल्या कवी संमेलनात रायगड जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर केल्या. यावेळी मधु मंगेश कर्णिक, रामदास फुटाणे व अरुण म्हात्रे, नमिता कीर, प्रा.एल.बी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते. हे कवी संमेलन अ‍ॅड.चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड कोमसापच्या कवींना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड.चंद्रकांत मढवी, नारायण सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. खुल्या कवी संमेलनामध्ये झालेल्या काव्य स्पर्धेत जुईली आतीतकर हिने प्रथम क्र मांक, अरुण म्हात्रे यांनी द्वितीय क्र मांक, बी.डी.घरत यांना तृतीय क्र मांक तर दीपक सकपाळ आणि रवींद्र सोनावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. संमेलनाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे, जयमाला जांभळे यांनी केले.

Web Title: Poetry is a celebration of sensuality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.