पनवेल : तळोजात प्रदूषण करणाºया आणि त्याकडे डोळेझाक करणाºया यंत्रणेविरोधात पनवेल पालिकेतील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी लवादाकडे दाद मागितली आहे. लवादाने सर्व संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत.तळोजा औद्योगिक क्षेत्रात वारंवार होत असलेल्या जल व वायू प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवा आणि जलप्रदूषण घोट व कासाडी नदीच्या मुळावरच उठले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये सतत प्रदूषित, रासायनिक घटक प्रक्रि या न करता सोडले जात आहे. सद्यस्थितीला नदीच्या प्रदूषणाची पातळी १३ पटीने वाढली आहे. याचा फटका नदीतील जैवविविधतेला बसला आहे. अनेक मासे, जीवजंतूंच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.महापालिकेच्या चार महासभेत तसेच प्रदूषण मंडळाकडे नगरसेवक म्हात्रे यांनी वारंवार तक्रार केली. प्रदूषण करणाºया कारखान्यांविरोधात कारवाईची मागणी केली. या मागणीवर पालिका आणि प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात येईल, एवढे एकच उत्तर वारंवार दिले जात होते. त्या पलीकडे कुठलीही कारवाई झाली नाही. महापालिका व प्रदूषण मंडळाकडून होणाºया दुर्लक्षामुळे म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली.मंगळवारच्या महासभेत म्हात्रे यांनी याबाबत माहिती दिली. हरित लवादाकडे केलेल्या याचिकेत म्हात्रे यांनी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पनवेल महापालिका आणि रायगड जिल्हाधिकाºयांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याबाबत संबंधित विभागांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.>प्रदूषणाचा त्रास आजूबाजूच्या सिडको वसाहतींनाहीतळोजा औद्योगिक परिसरात ९००पेक्षा जास्त लहान-मोठे कारखाने आहेत.या ठिकाणाहून निघणाºया धुरावर प्रदूषण नियंत्रक मंडळाचे नियंत्रण नसल्याने तळोजा अद्योगिक वसाहती लगत असलेल्या खारघर, कळंबोली, कामोठे या वसाहतीत हवा प्रदूषणाच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे या वसाहतीत उग्र वासाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खारघरमध्ये याविरोधात एक मोहीमही उभी राहिली असून खारघर सेक्टर ३५मधील रहिवासी मंगेश रानवडे यांनी ही मोहीम सुरू केली आहे.>प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य अंमलबजावणीची गरजतळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणाºया नद्यांमधील तसेच परिसरातील प्रदूषणाची पातळी मोजणारी सक्षम यंत्रणा स्थानिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही. अशी यंत्रणा ठिकठिकाणी बसवून ठरावीक दिवसाच्या अंतराने प्रदूषणाची पातळी मोजावी. त्यासाठी स्थानिक नागरिक, प्रदूषण मंडळ, औद्योगिक विभागातील संबंधित कर्मचारी यांची समिती गठित करण्याची गरज आहे.>तळोजा अद्योगिक वसाहतीत एफएसआय चा मोठा घोटाळातळोजा अद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली करून एफएसआयचा घोटाळा झाला आहे. यासंदर्भातही वेळोवेळी तक्र ारी करण्यात आल्या असल्याची माहिती नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी दिली आहे. पालिका अथवा एमआयडीसीने याकडे लक्ष घातल्यास हजारो कोटींचा एफएसआय घोटाळा उघडकीस येईल, असेही म्हात्रे यांनी सांगितले.
तळोजातील प्रदूषणाचा मुद्दा हरित लवादाकडे, जल, वायुप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 2:55 AM