दगडखाणीतील स्फोटात पोकलेनचालकाचा मृत्यू, दोघे जखमी; कुंडेवहाळ येथील घटना
By नारायण जाधव | Published: January 30, 2024 06:37 PM2024-01-30T18:37:27+5:302024-01-30T18:37:40+5:30
नवी मुंबईच्या उरण-पनेवलपरिसरतील दगडखाणचालकांचा निष्काळपणी दिवसेंदिवस वाढतच आहे.
नवी मुंबई: नवी मुंबईच्या उरण-पनेवलपरिसरतील दगडखाणचालकांचा निष्काळपणी दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच कोणत्याही प्रकारची काळजी न घेतल्याने आणि शासनाने घालून दिलेली नियमावली पायदळी तुडविल्याने पनवेलच्या कुंडेवहाळ येथील एका दगडखाणीत स्फोटातील दगड उडून पोकलेनचालकांच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी घडल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
पनवेलमध्ये सर्वाधिक ८० हून जास्त खदाणी व क्वॉरी आहेत. कुंडेवहाळ गावातील क्वॉरीमध्ये सोमवारी दुपारी दोन वाजता झालेल्या अविनाश केशव कुजूर असे दुर्दैवी चालकाचे नाव असून पनवेल शहर पोलिसांनी दगडखाणमालकांएैवज तेथे सुरुंगाव्दारे स्फोट घडविणाऱ्या ५३ वर्षीय कुलामणी राऊत याच्याविरोधात गुन्हा नोंदविल्याने संताप व्यक्त होत आहे.
दगडखाणीत ७० ते ८० मीटर अंतरावर हे कामगार व पोकलेनचालक उभे असताना स्फोट केल्याने ही घटना घडली. ॲन्थोनी भोईर यांची कुंडेवहाळ गावात ही दगडखाण आहे. या अपघातात १८ वर्षीय अंकीत शहा, कामावर देखरेख करणारे अंकुश निरगुडा तसेच पोकलेन चालक कजूर यांच्या अंगावर दुपारी दोन वाजता अचानक स्फोट झाल्याने दगड उडाले. हे तिघेही जखमी झाले. मात्र, या दगडांचा मारा एवढा जबरदस्त होता की या माऱ्यामध्ये पोकलेन चालक कुजूर हा जागीच ठार झाला. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी भारतीय दंड संहिता १८६०, ३०४ अ अंतर्गत रितसर तक्रार नोंदविली आहे. पनवेल व उरणमधील अनेक दगडखाणमालकांकडे सुरुंग स्फोट घडविणारे कामगार हे अकुशल असून त्यामुळेच असे अपघात होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय स्फोट घडवून दगड काढताना संरक्षित जाळी लावणे तसेच भोंग्याने दवंडी पिटणे असतानाही असे होत नाही.