माथेरानमध्ये पोलिसांकडून वाहनबंदीचे उल्लंघन
By admin | Published: April 17, 2017 03:13 AM2017-04-17T03:13:55+5:302017-04-17T03:13:55+5:30
माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित असल्याने माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. मात्र, कल्याण येथील एका पोलीस निरिक्षकाने
माथेरान : माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित असल्याने माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. मात्र, कल्याण येथील एका पोलीस निरिक्षकाने चक्क खासगी गाडी घेऊन माथेरानमध्ये आला. पोलिसाने बेधडकपणे खासगी मोटार गावात नेल्यामुळे तसेच वाहनबंदीचे उल्लंघन केल्यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
रविवारी कल्याण (खडकपाडा) येथील सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. सोनावणे हे सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला खासगी वाहनातून (क्र.एम.एच.०४ इ.एस.९३३३) चौकशीसाठी माथेरान येथे घेऊन आले होते. येथे मोटार गाड्या गावात नेण्यास मनाई असल्याचे दस्तुरी नाका येथील प्रवासी कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डी. एन. सोनावणे यांना सूचित केले होते; परंतु स्वत:च्या जबाबदारीवर त्यांनी गाडीचालक आर. पी. सिंग यास गाडी गावात नेण्यास सांगितली. त्यामुळे खासगी गाडी गावात आल्याचे पाहून स्थानिकांनी गाडीला गराडा घालून संबंधित पोलीस अधिकारी डी. एस. सोनावणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांच्याकडे के ली. त्यावरून ही गाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली आहे.
मात्र, पोलीस प्रशासनाने सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गाडीचा चालक आर. पी. सिंग याच्यावर कलम ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)