खंडणीखोरांना पोलीस कोठडी

By admin | Published: January 30, 2016 02:34 AM2016-01-30T02:34:07+5:302016-01-30T02:34:07+5:30

पनवेल येथील हॉंटेल चालकाकडून एक लाखाची खंडणी स्वीकारणारा पत्रकार नीलेश सोनावणे व मनसेच्या नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड यांना न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस

Police closet to rioters | खंडणीखोरांना पोलीस कोठडी

खंडणीखोरांना पोलीस कोठडी

Next

पनवेल : पनवेल येथील हॉंटेल चालकाकडून एक लाखाची खंडणी स्वीकारणारा पत्रकार नीलेश सोनावणे व मनसेच्या नवीन पनवेल शहर अध्यक्ष पराग बालड यांना न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी आरोपींना खंडणीविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले होते. यांच्यावर अपहरण तसेच खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पनवेल येथे न्यू पंजाब हे हॉंटेल नव्याने सुरु झाले असून हॉंटेल मालक सचिन सचदेव यांच्याकडून तीन आरोपींनी २ लाखांची खंडणी मागितली होती. हॉंटेलच्या परवानग्या नसल्याचे सांगून दोघा आरोपींनी दोन लाखांची खंडणी मागितली होती. यासंदर्भात हॉंटेल मालकाने नवी मुंबई खंडणी विरोधी पथकाकडे तक्र ार केली होती. त्यानंतर सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांचा तिसरा साथीदार मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या आरोपीवर अपहरण व खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Police closet to rioters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.