Police Commemoration Day : पोलीस दलातील शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:20 PM2018-10-21T23:20:58+5:302018-10-21T23:21:03+5:30
पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात संचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मुख्य सीमाशुल्क आयुक्त विवेक जौहरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
नवी मुंबई : पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात संचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मुख्य सीमाशुल्क आयुक्त विवेक जौहरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमास आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
देशभरात २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून आयोजित केला जातो. यादिवशी वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीचे स्मरण केले जाते. त्यानुसार रविवारी सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात शहिदांना मानवंदना वाहण्यात आली. या कार्यक्रमास मुख्य महसूल आयुक्त विवेक जौहरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वर्षभरात देशभरात शहीद झालेल्या ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. यावेळी आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्यासह सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान परेडनंतर पोलिसांच्या कुटुंबीयांनी हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करून कर्तव्य बजावताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या कार्याला मानवंदना दिली.