पोलीस आयुक्तांनी डोळ्यावर पट्टी बांधून केले झेब्रा क्रॉसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:40 PM2018-10-15T23:40:43+5:302018-10-15T23:41:00+5:30
खारघरमध्ये जनजागृती : अंधांना मदत करण्याचे नागरिकांना आवाहन
- वैभव गायकर
पनवेल : झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व काय आहे हे सर्वसामान्य नागरिकांपेक्षा नेत्रहीन व्यक्तीच जास्त समजू शकतात. वाहन चालवताना चालक सर्रास वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत असतात. अशावेळी त्याचे परिणाम समाजातील विकलांग, नेत्रहीन घटकांवर कशाप्रकारे होत असतात याची माहिती खारघरमध्ये आयोजित एका कार्यक्र माद्वारे देण्यात आली. विशेष म्हणजे आयुक्तांनी नेत्रहीनांच्या भावना समजून घेण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून रस्ता क्रॉस केला.
सोमवारी जागतिक व्हाईट केन डे निमित्त विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. झेब्रा क्र ॉसिंगच्या आधारे शारीरिक विकलांग व नेत्रहीन व्यक्ती रस्ता ओलांडत असतात. मात्र वाहन चालक वाहतूक नियमांची तमा न बाळगता थेट झेब्रा क्र ॉसिंगवरच गाड्या उभ्या करत असतात. अशावेळी नेत्रहीनांची होणारी अवस्था त्यांची अडवणूक लक्षात घेता . वर्ल्ड व्हाईट केन डे निमित्त अनोख्या कार्यक्र माचे आयोजन ज्ञानमगंगा इंडियन स्काऊट अँड गाईड फेलोशिप गिल्ड संस्थेमार्फत करण्यात आले होते. या कार्यक्र माला नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी विशेष उपस्थिती लावली. विशेष म्हणजे आयुक्तांनी नेत्रहीनांच्या भावना समजून घेण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून रस्ता क्रॉस केला . यावेळी नेत्रहीनांची होणारी अवस्था पाहून त्यांनी झेब्रा क्रॉसिंग महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्र माचे आयोजन ज्ञानमगंगा इंडियन स्काऊट अँड गाईड फेलोशिप गिल्ड संस्थेचे डॉ. राजेश शुक्ला यांनी केले होते. कार्यक्रमाला २० पेक्षा जास्त नेत्रहीन उपस्थित होते. यावेळी नेत्रहीन, विकलांग यांच्या भावना समजून घेण्याच्या दृष्टीने पत्रकांचे देखील वाटप करण्यात आले.
यावेळी ज्ञानमगंगा इंडियन स्काऊट अँड गाईड फेलोशिप गिल्ड संस्थेचे सदस्य, खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, पनवेल महापालिका प्रभाग अ चे सभापती अभिमन्यू पाटील, वाहतूक शाखेचे प्रवीण पांडे उपस्थित होते.