रोडपालीत पोलिसांनी बनवले क्र ीडांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:29 AM2017-12-06T01:29:49+5:302017-12-06T01:30:01+5:30
रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडाकडे सिडकोने दुर्लक्ष केले होते; परंतु राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी या जागेचे रु पडे पालटले आहे.
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडाकडे सिडकोने दुर्लक्ष केले होते; परंतु राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी या जागेचे रु पडे पालटले आहे. या मैदानाचे सपाटीकरण करून, त्या ठिकाणी उत्तम क्र ीडांगण तयार करण्यात आले आहे. त्याचा फायदा स्पर्धा झाल्यानंतर येथील रहिवाशांना होणार आहे.
नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला सेक्टर १७ येथे क्र ीडांगणाकरिता राखीव जागा ठेवण्यात आली होती. येथे क्र ीडा संकुल उभारण्याकरिता एका संस्थेला भूखंड देण्यात आला होता; परंतु सभासदांकडून लाखो रुपये जमा करून संस्थाचालक पसार झाले. त्यामुळे क्र ीडासंकुलाचा प्रस्ताव रेंगाळला. आता दहा एकराचा भूखंड मोकळा आहे. रोडपालीला क्रीडांगणाची वानवा असताना सिडकोने अद्यापही ही जागा विकसित केली नाही. या ठिकाणी पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत होते. पावसामुळे या जागेवर झाडेझुडपे, गवत वाढले होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत होता. याशिवाय काही फेरीवाले झाडाझुडपांचा फायदा घेत येथे कचरा टाकत होते. या व्यतिरिक्त काही प्रमाणात डेब्रिजही छुप्या पद्धतीने टाकले होते. सिडकोकडून याबाबत दुर्लक्ष होत होते.
दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या वतीने या भूखंडावर श्रमदान करण्यात आले. प्रशिक्षणार्थी पोलिसांनी येथील गवत काढून साफसफाई केली. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई पोलीस या ठिकाणी राबताना दिसत आहेत. या भूखंडावर शेकडो ट्रक माती टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यावर लाल माती टाकण्यात आली आहे. त्याचबरोबर विविध खेळ खेळण्याची सोयसुद्धा करण्याचे काम सुरू आहे.