- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत संपुर्ण आयुक्तालय क्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी कंबर कसली आहे. त्याकरिता आचारसंहिता घोषीत झाल्यापासून ते मतमोजनीची प्रक्रिया होईपर्यंत सुमारे ३५०० पोलिस कर्मचारी व ३०० अधिकारी चोख बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी ३२ पथके तयार करण्यात आली असून, त्यापैकी १६ पथकांमार्फत संशयीत ठिकाणी छापे टाकण्याचे काम केले जाणार आहे.राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून त्याप्रमाणे नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात देखिल राजकीय हालचालींना गती मिळाली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे काम पोलीसांकडून सुरु आहे. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात येणारया ऐरोली, बेलापुर, पनवेल व उरण या चारही विधानसभा क्षेत्रात चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. तशा प्रकारे बंदोबस्ताचा आराखडा देखिल पोलीसांकडून तयार करण्यात आला आहे. निवडणुक काळात मतदारांना लुभावण्याचा अथवा धमकावण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. त्याकरिता पैशासह बळाचा वापर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मतदारांना निर्भयपने मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता पोलीसांकडून सर्वच मतदान केंद्राचा आढावा घेण्यात आला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा काही मतदान केंद्रामध्ये बदल करण्यात होण्याची शक्यता आहे. त्यानुसार महसुल विभागाकडून यासंबंधीची माहिती प्राप्त होताच, पोलीसांकडून आवश्यकतेनुसार नियोजनात इतरही बदल केले जाणार आहेत.दरम्यान चारही विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाल्यापासुन ते मतमोजनी होईपर्यंत महत्वाच्या ठिकाणांसह इतर गर्दीच्या ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त राहणार आहे. त्याकरिता ३०० पोलीस अधिकारी व ३५०० कर्मचारी कर्तव्यावर नेमण्यात आले आहेत. याकरिता पोलीसांच्या रजा देखिल रद्द करुन सर्वांना कर्तव्यावर हजर राहण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय ११०० होमगार्ड देखिल पोलीसांच्या मदतीला असणार आहेत. त्यानुसार पुढील काही दिवसात संवेदनशिल भागांमध्ये रुट मार्च काढून पोलीसांकडून शक्तीचे प्रदर्शन करुन समाजास घातक प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कायदाचा धाक निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. अनेकदा मतदारांवर दबाव टाकण्यासाठी शहराबाहेरुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना बोलवले जाण्याची शक्यता असते. अथवा मद्यसाठा, पैसा यांची देखिल वाहतुक होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक शहरांच्या प्रवेशद्वारांवर चोख बंदोबस्त लावून संशयीत वाहनांची झडाझडती घेतली जाणार आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात गैर प्रकारांना आळा बसेल असा पोलीसांचा विश्वास आहे. तसेच निवडणुक कालावधीत कशा प्रकारे कामकाज केले पाहिजे, याविषयी देखिल पोलीसांना मार्गदर्शन केले जात आहे. त्याकरिता विशेष शाखेमार्फत पोलीसांची कार्यशाळा घेतल्या जात आहेत. यावरुन सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीसांनी कंबर कसली आहे.शस्त्रे जमा करण्याच्या सुचनाराजकीय व्यक्तींकडून त्यांच्याकडील परवाना असलेल्या शस्त्राचा निवडणुक कालावधीत गैरवापर होण्याची शक्यता असते. यामुळे निवडणुक कालावधीत अशी शस्त्रे पोलीसांकडून जप्त केली जातात. त्यानुसार आचारसंहिता लागू होताच संबंधीत व्यक्तींना त्यांच्याकडील शस्त्रे जमा करण्याचे सुचित करण्यात आले आहे.निवडणुकीच्या अनुशंघाने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील चारही विधानसभा क्षेत्रात पोलीसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याकरिता ३०० अधिकारी व ३५०० कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय नाकाबंदीत संशयीत वाहनांची झडाझडती घेण्यासह, फिरत्या पथकांमार्फत देखिल गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मतदारांना निर्भयपने मतदान करता यावे यासाठी नवी मुंबई पोलीस पुर्णपने सज्ज आहे.- सुरेश मेंगडे,पोलीस उपआयुक्त, विशेष शाखागैरप्रकारांवर कारवाईसाठी ३२ पथकेआयुक्तालय कार्यक्षेत्रात ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होता. त्या ठिकाणची गुन्हेगारीची मुळे उपटून टाकण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत. त्यानुसार, अवैध दारूविक्रीसह इतर अवैध धंदे, तसेच गैरकृत्यांना थारा देणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकले जाणार आहेत. त्याकरिता एकून ३२ पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये १६ स्थिर तर १६ भरारी पथकांचा समावेश असणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, गैरप्रकारांवर करडी नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 2:53 AM