शहरात पोलिसांचा जागता पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:27 PM2019-05-22T23:27:51+5:302019-05-22T23:39:07+5:30

आवश्यक ठिकाणी नाकाबंदी। संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त; फिरती पथके कार्यरत

Police guard the city | शहरात पोलिसांचा जागता पहारा

शहरात पोलिसांचा जागता पहारा

Next

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतमोजणी पोलीस आयुक्तालयाबाहेर होणार असली, तरीही निकालानंतरच्या वातावरणातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.


लोकसभेसाठी झालेल्या मतदानाची संपूर्ण देशात गुरुवारी मतमोजणी होणार आहे, त्यानुसार ठाणे व मावळ लोकसभेच्या निकालाची उत्सुकता असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनीही विजयी जल्लोषाची तयारी ठेवली आहे. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडूनही आपल्याच विजयाची आशा व्यक्त केली जात आहे. यामुळे बहुतांश सर्वच राजकीय व अपक्ष पक्षांच्या उमेदवारांनी आपापला गुलाल तयार ठेवला आहे. या दरम्यान किरकोळ कारणावरून विरोधी गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद उद्भवू नयेत, अनपेक्षित प्रकार घडू नये, याकरिता नवी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. तर बुधवार रात्रीपासून ते निकालाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ड्राय डे घोषित करण्यात आलेला आहे.


नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मावळ व ठाणे या दोन लोकसभा क्षेत्राच्या काही भागाचा समावेश होतो. त्यामध्ये ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण या दोन विधानसभांचा समावेश आहे. या दोन्ही लोकसभेची मतमोजणी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या बाहेर होणार आहे. मात्र, आगामी विधानसभेच्या अनुषंगाने या निकालाला अधिक महत्त्व मिळत असल्याने, त्याचे पडसाद नवी मुंबईतही उमटणार आहेत. या दरम्यान कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोष साजरा होत असताना अथवा इतर कारणांवरून विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन दिवसांकरिता बंदोबस्त आहे.

संवेदनशील ठिकाणी साध्या वेशातील पोलीस नेमण्यात आले आहेत. शिवाय फिरत्या पथकांमार्फत गैरहालचालींवर लक्ष राहणार आहे, तर अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी लावून संशयित वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Police guard the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.