पोलिसाने वाचविले वृध्दाचे प्राण

By admin | Published: September 28, 2016 03:03 AM2016-09-28T03:03:09+5:302016-09-28T03:03:09+5:30

पोलिसाच्या धाडसामुळे खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृध्दाचे प्राण वाचले आहेत. दिवाळे खाडीपुलावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, वृध्दावर रुग्णालयात

Police saved the life of the old man | पोलिसाने वाचविले वृध्दाचे प्राण

पोलिसाने वाचविले वृध्दाचे प्राण

Next

नवी मुंबई : पोलिसाच्या धाडसामुळे खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृध्दाचे प्राण वाचले आहेत. दिवाळे खाडीपुलावर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, वृध्दावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुलावरून अज्ञाताने उडी टाकल्याचे समजताच त्याठिकाणी एनआरआय पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाने स्वत:च्या जिवाची पर्वा न करता खाडीत उडी मारून बुडणाऱ्या वृध्दाला बाहेर काढले.
मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सीबीडी ते उलवे दरम्यानच्या खाडीपुलावर हा प्रकार घडला. सदर पुलावरुन एका वृध्दाने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या कंट्रोल रुमवर मिळाली होती. ही माहिती मिळताच एनआरआय पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरविंद संख्ये
यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.
दरम्यान, त्यांनी सदर प्रकाराचा संदेश लगतच्या परिसरात बंदोबस्तावर असलेल्या इतरही पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. त्याचवेळी सागरी सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस शिपाई जनार्दन बळावकर यांच्यापर्यंत हा संदेश पोचला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याठिकाणी जावून खाडीत उडी मारली व बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढले. दरम्यान, संख्ये यांनी घटनास्थळाकडे जातानाच रुग्णालयात कळवल्यामुळे वेळीच रुग्णवाहिका घटनास्थळी पोचली होती. त्यामधून सदर व्यक्तीला वेळीच सीबीडीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
अधिक चौकशीत मोहन पाचनेकर (६२) असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांना समजले. ते दिवाळे गावचे राहणारे असून पत्नीसह त्याठिकाणी सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेले होते. परंतु पुलालगत गेल्यानंतर पत्नीला काही अंतर लांब थांबवून त्यांनी खाडीत उडी मारल्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बगाडे यांनी सांगितले.
पोलीस शिपाई जनार्दन बळावकर यांचे धाडस व उपनिरीक्षक अरविंद संख्ये यांची कार्यतत्परता यामुळे पाचनेकर यांचे प्राण वाचले आहेत. परंतु त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे कारण अद्याप कळले नसल्याचेही बगाडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Police saved the life of the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.