पोलीस उपमहानिरीक्षकाविरुद्ध तक्रार करणारी तरुणी बेपत्ता, पोलिसांकडून शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:25 AM2020-01-08T06:25:20+5:302020-01-08T06:25:41+5:30

पोलीस उपमहानिरीक्षकाविरोधात (डीआयजी) विनयभंगाचा आरोप करणारी अल्पवयीन तरुणी सोमवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.

Police search for missing, youth complaining against Deputy Inspector General of Police | पोलीस उपमहानिरीक्षकाविरुद्ध तक्रार करणारी तरुणी बेपत्ता, पोलिसांकडून शोधाशोध

पोलीस उपमहानिरीक्षकाविरुद्ध तक्रार करणारी तरुणी बेपत्ता, पोलिसांकडून शोधाशोध

Next

पनवेल : पुणे येथे एम.टी. विभागात कार्यरत असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षकाविरोधात (डीआयजी) विनयभंगाचा आरोप करणारी अल्पवयीन तरुणी सोमवारी रात्री घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केली आहे.
‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, माझ्या आत्महत्येस डीआयजीे जबाबदार असतील,’ अशी चिठ्ठी या तरुणीने लिहून ठेवली आहे. त्या मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी २६ डिसेंबरला या डीआयजीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तळोजातील एक विकासक व डीआयजी यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. डीआयजींनी विकासकाकडून गाळे विकत घेतले होते. पण त्याची उर्वरित रक्कम न दिल्याने विकासकाने पोलिसांकडे तक्रार केली. जूनमध्ये त्यांच्या १७ वर्षांच्या मुलीच्या वाढदिवशी डीआयजी घरी आले आणि मुलीच्या गालावर व शरीरावर केक लावून अश्लील वर्तन केले, अशी तक्रार करताच पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
>जामिनासाठी प्रयत्न
गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे समजते.
तरुणीचा शोध घेणे सुरू आहे. त्यासाठी सहा पथके स्थापन केली आहेत.
- अशोक दुधे, पोलीस उपायुक्त

Web Title: Police search for missing, youth complaining against Deputy Inspector General of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.