पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाण्यात भाजपा नगरसेवक राजू सोनी यांचा वाढदिवस साजरा करणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे यांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी त्यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नार्कोटिक्स विभागातील विनोद चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शुक्रवारी उशिरा विनोद चव्हाण यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा पदभार स्वीकारला. पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा केल्यानंतर संबंधित प्रकार त्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या कॅमेºयात कैद केला होता. या प्रकाराची जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर बाजारेची या ठिकाणाहून आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात भाजपा नेत्याचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 2:56 AM