तीन अधिकाऱ्यांना राष्टÑपती पदक, उपआयुक्त सुरेश मेंगडे यांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 03:50 AM2019-08-15T03:50:59+5:302019-08-15T03:51:09+5:30

पोलीस आयुक्तालयातीन तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे.

 The Police three officers also received the Presidential Medal | तीन अधिकाऱ्यांना राष्टÑपती पदक, उपआयुक्त सुरेश मेंगडे यांचाही समावेश

तीन अधिकाऱ्यांना राष्टÑपती पदक, उपआयुक्त सुरेश मेंगडे यांचाही समावेश

Next

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालयातीन तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. त्यामध्ये उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्यासह सहायक आयुक्त किरण पाटील व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांचा समावेश आहे.

उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाते. त्यानुसार बुधवारी घोषित करण्यात आलेल्या यादीमध्ये नवी मुंबईतील तीन पोलीस अधिका-यांचा समावेश आहे. त्यामध्ये पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त किरण पाटील व वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांचा समावेश आहे. मेंगडे यांनी नागरी हक्क संरक्षण विभागात असताना त्या विभागाचा चेहरा मोहरा बदलला. त्याकरिता राज्यभरात पोलिसांसह नागरिकांच्याही कार्यशाळा घेण्यात आल्या. दलित-सवर्णमध्ये असलेली दरी मिटवण्यासाठी त्यांनी या विभागामार्फत पुरेपूर प्रयत्न केले. तर अत्याचारांच्या गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी जुन्या जजमेंट तपासून त्यातील सुधाराच्या अनुषंगाने पोलिसांनाही मार्गदर्शन केले. त्यांनी यापूर्वीही नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात काम केले असून, या दरम्यान त्यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घातला होता. त्याकरिता सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांना अधिकाधिक शिक्षा लागेल या अनुषंगाने तपासावर भर दिला होता. तर शहरातील भिकाºयांची समस्या निकाली काढण्यासाठी त्यांची धरपकड करून बेगर्स होममध्ये रवानगी करण्याची मोहीम राबवली होती.

सहायक आयुक्त किरण पाटील यांनी मागील कार्यकाळात तपासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी केलेली आहे. गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांच्याकडून पोलिसांना मार्गदर्शन सुरू असते. त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांना २०१२ मध्ये पोलीस महासंचालक यांच्या सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे. त्यांनी कोपरखैरणे पोलीसठाण्यात कार्यरत असताना गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण केला होता. तर जनतेमध्ये पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचाही प्रयत्न केला. यादरम्यान काही सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या उद्देशाने त्यांना तडीपार करण्यासंबंधीचा अहवाल करून तो वरिष्ठांकडे सोपवला. यामुळे गोमांस विक्रेते, फसवणूक अशा गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली आहे.

Web Title:  The Police three officers also received the Presidential Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस