शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

प्लॅस्टिकविरोधी मोहिमेत पालिका प्रशासन उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 5:13 AM

प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घातल्यानंतर महापालिका क्षेत्रात झालेल्या कारवायांमध्ये सुमारे ३४ हजार किलो प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : प्लॅस्टिकच्या वस्तूंवर बंदी घातल्यानंतर महापालिका क्षेत्रात झालेल्या कारवायांमध्ये सुमारे ३४ हजार किलो प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. त्याद्वारे संबंधितांकडून साडेसात लाखांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे; परंतु अद्यापही कारवाईत सातत्य नसल्याने प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा उघडपणे वापर सुरू असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यापासून महापालिका क्षेत्रात २६ पेक्षा अधिक वेळा ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतांश कारवाया प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनेनुसार महापालिकेने केलेल्या आहेत. त्यामध्ये २३२ व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडील प्लॅस्टिकचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. चार महिन्यांत झालेल्या या कारवायांपैकी सर्वाधिक कारवाया आॅक्टोबर महिन्यात झाल्या आहेत. या एकूण कारवायांमधून सुमारे ३४ हजार किलो प्लॅस्टिक जप्त करून सात लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे;परंतु त्यानंतरही प्रशासनाच्या कारवायांमध्ये सातत्य नसल्याने अद्यापही शहरात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे. यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची शहरात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अभियानाचाही फज्जा उडत आहे.शिवाय पालिकेकडून होणाऱ्या कारवाया छोट्या व्यावसायिकांवरच होत असल्याने मोठे उद्योजक मोकाट असल्याचीही खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे पालिकेने कारवाईत सातत्य राखून प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आल्या आहेत. यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ सुचवेल तेव्हाच कारवाया होत असून पालिकेचे अधिकारी स्वत:हून कारवाईसाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे, तर बंदीनंतरही प्लॅस्टिकचा वापर करणाºयांवर गुन्हे दाखल होणे अपेक्षित असतानाही केवळ दंड आकारून समाधान मानले जात असल्याचेही दिसत आहे. शिवाय पालिकेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करणे गरजेचे असतानाही अद्यापपर्यंत तो सादर झालेला नाही. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांना प्लॅस्टिकच्या पिशव्या व साहित्यांचा पुरवठा करणारे मोकाटच आहेत.प्लॅस्टिकविरोधी मोहिमेअंतर्गतच्या कारवाईत संबंधितांवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून अशा पुरवठादारांची माहिती पालिकेने मिळवणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला अपेक्षित आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत अशा प्लॅस्टिक उत्पादकांवर ठोस कारवाई केली जाऊ शकते; परंतु कारवाईचे सर्वाधिकार पालिकेकडे दिलेले असतानाही फारसे गांभीर्य घेतले जात नसल्याचे दिसत आहे.गुन्हे दाखल करण्याची मागणीप्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी संयुक्तरीत्या सुमारे ३० छापे टाकले. त्यामध्ये २३२ छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करून सात लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला; परंतु प्लॅस्टिकविरोधी मोहीमही दंड वसुलीकरिता न राबवता, संबंधितांवर गुन्हे दाखल करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी व्हावी, अशी भावना पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका संयुक्तरीत्या प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबवत आहे; परंतु प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबवली जाण्यासाठी महापालिकेकडून कारवाईत सातत्य आवश्यक असून तशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. शिवाय, शहरात प्लॅस्टिकचे साहित्य पुरवणाºयांचाही शोध लागणे आवश्यक आहे, अशा उत्पादकांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.- राजेंद्र पाटील,उपप्रादेशिक अधिकारी,एमपीसीबी17 वेळा केवळ आॅक्टोबर महिन्यात ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर मात्र कारवाईत सातत्य न राहिल्याने सर्रासपणे प्लॅस्टिकचा वापर होत आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी