नवी मुंबई ः राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी घेतलेल्या बैठकीत सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्यातील महापालिकांवरील प्रशासकांना पुन्हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सर्वात मोठा धसका शहरातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. कारण वारंवार निवडणूक पुढे ढकलण्याचा सर्वात मोठा फटका नवी मुंबई महापालिकेला बसला आहे.
या महापालिकेची निवडणूक गेल्या अडिच वर्षांपासून झालेली नाही. चार वेळा ती पुढे ढकलली गेली आहे. यामुळे धोरणात्मक निर्णयांअभावी शहराचा विकास रखडला आहे. याबाबत. नागरिकांकडून राजकिय पक्षाच्या नेत्यानाच विचारणा करण्यात येत असल्याने ते पुरते वैतागले आहेत.
आता मंगळवारी पुन्हा प्रशासक असलेले आयुक्त अभिजित बांगर यांना मुदतवाढ मिळणार आहे. आतापर्यंत विविध कारणांनी आरक्षण सोडत होऊनही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र यामुळे मतदारांच्या सहली, भोजनावळीवर इच्छुकांचा मोठा खर्च झालेला आहे.
आतापर्यंत झालेला कार्यक्रम -२०२० मधील निवडणूक प्रक्रिया१ फेब्रुवारी २०२० - प्रारूप प्रभागरचनेची आरक्षण सोडत जाहीर३ ते १० फेब्रुवारी - प्रभागरचनेवरील हरकती सादर करण्याची मुदत९ मार्च - प्रारूप मतदार यादी जाहीर९ ते १६ मार्च - मतदारयाद्यांवर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत२३ मार्च - प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती.२४ मार्च - मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार होती.२६ मार्च - प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध हाेणार होती.१६ मार्च - कोरोनामुळे शासनाने निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या.२०२१ निवडणूक प्रक्रियानवी मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया २०२१२ फेब्रुवारी २०२१ - निवडणूक आयोगाने महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.१६ फेब्रुवारी - प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याची घोषणा.२३ फेब्रुवारी - मतदारयाद्यांवर सूचना व हरकती सादर करण्यास मुदत.२३ फेब्रुवारी - मतदारयाद्यांवर ३४९७ हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या.२६ फेब्रुवारी - कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली.२०२२ निवडणूक प्रक्रिया.१ फेब्रुवारी - राज्य निवडणूक विभागाने प्रभागरचना जाहीर केली. ४१ प्रभागांमध्ये १२२ सदस्य निश्चित केले.१४ फेब्रुवारी - सूचना व हरकती दाखल करण्यासाठी मुदत.१४ फेब्रुवारी - प्रभागरचनेवर ३८५२ सूचना व हरकती दाखल.१८ फेब्रुवारी - सूचना व हरकतींवर सुनावणी.मार्च - ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक पुन्हा लांबणीवर.११ मे - अंतिम प्रभागरचना जाहीर.३१ मे - महानगरपालिका निवडणुकीसाठी पुन्हा आरक्षण सोडत.२३ जून - प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध.१६ जुलै - प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध.२९ जुलै - ओबीसी व सर्वसाधारण महिला प्रभाग आरक्षण सोडत.