- नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिका निवडणुकीमध्ये सर्व प्रमुख पक्षांमध्ये घराणेशाहीलाच प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. ज्येष्ठ नगरसेवकांनी एकापेक्षा जास्त प्रभागांवर दावा केला आहे. आरक्षित प्रभागांमध्येही स्वत:च्या घरातील महिला पदाधिकाऱ्यांना संधी मिळावी, यासाठी आग्रह धरला जात असून प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पुन्हा फक्त प्रचारक म्हणूनच उपयोग होणार आहे.नवी मुंबईच्या राजकारणामध्ये घराणेशाही नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. २०१० ते २०१४ या काळामध्ये बेलापूर मतदारसंघामधून गणेश नाईक व ऐरोलीमधून संदीप नाईक निवडून आले होते. ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक खासदार म्हणून निवडून आले व नंतर झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर सागर नाईक महापौर बनले. एकाच घरात सर्व पद एकवटल्यामुळे विरोधकांनी टीका केली होती. यामुळे २०१५ च्या महापालिका निवडणुकीमध्ये नाईक परिवारातील कोणीही महापालिकेची निवडणूक लढविली नव्हती; परंतु यामुळे घराणेशाही संपली नाही. राष्ट्रवादी, शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकाच घरामध्ये एकापेक्षा जास्त जणांना उमेदवारी दिली होती. दोन ते तीन नगरसेवक एकाच घरामधील निवडून आले होते. या वर्षीच्या निवडणुकीमध्येही घराणेशाही कायम राहणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. १ फेब्रुवारीला आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. १११ पैकी ५६ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. ज्यांना आरक्षणाचा फटका बसला त्या सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील महिलेला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत ज्या महिला कधीच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय नव्हत्या, त्यांचे फोटो होर्डिंगवर झळकू लागले आहेत. कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती वाढली आहे.सर्वच राजकीय पक्षांची महिलांची कार्यकारिणी अस्तित्वात आहे. जिल्हा अध्यक्ष व वार्ड स्तरापर्यंत महिला पदाधिकाºयांची रचना आहे. वर्षभर अनेक महिला कार्यकर्त्या पक्षाचे कार्यक्रम, आंदोलन व इतर सर्व उपक्रमामध्ये सहभागी होत असतात. स्वत:ही विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते; परंतु निवडणुका जवळ आल्यापासून उमेदवारीसाठी या महिला कार्यकर्त्यांचा विचार केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. नगरसेवकांनी व प्रमुख पदाधिकाºयांनी स्वत:च्या घरातील महिलांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी हट्ट धरण्यास सुरुवात केली आहे. इच्छूक उमेदवारांच्या यादीमध्येही आपल्या नातेवाइकांची वर्णी लावली आहे. यामुळे प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. येणाºया निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे काम करणाºया महिला पदाधिकाºयांना संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.नाराजी वाढलीमहापालिका निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर अनेक नगरसेवकांनी त्यांची पत्नी किंवा घरातील इतर महिला सदस्यांना उमेदवारी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. होर्डिंगवरही त्यांचे फोटो दिसू लागले आहेत. यामुळे प्रामाणिकपणे काम करणाºया महिला पदाधिकाºयांमधील नाराजी वाढली आहे. अनेक पदाधिकाºयांनी बंडखोरी करण्याची तयारीही सुरू केली आहे.प्रामाणिकपणे काम करणाºया महिला पदाधिकाºयांना निवडणुकीमध्ये संधी मिळाली पाहिजे. तिकीटवाटप करणाºया समितीमध्येही निर्णय प्रक्रियेमध्येही महिलांना प्राधान्य असले पाहिजे. प्रामाणिकपणे काम करणाºयांना संधी मिळावी, यासाठी सर्वांनीच आवाज उठविला पाहिजे.- भीम रासकर, महिला राजसत्ता आंदोलन, राज्य समिती सदस्यसर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीनवी मुंबईमधील राजकारणामध्ये नाईक परिवारावर घराणेशाहीचा आरोप अनेक वेळा झाला; परंतु महापालिकेमध्ये सर्वच प्रमुख पक्षांमध्ये घराणेशाही असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. सद्यस्थितीमध्ये चार जणांच्या घरातील प्रत्येकी तीन नगरसेवक, सात जणांच्या घरातील प्रत्येकी दोन नगरसेवक महापालिकेमध्ये कार्यरत आहेत. या वेळीही अशीच स्थिती असणार आहे.आरक्षित प्रभागसर्वसाधारण महिला४, ५, ११, १४, १८, २२, २३, २६, २८, २९, ४०, ४२, ४६, ४९, ५०, ५५, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६७, ६८, ७४, ७५, ८४, ८९, ९२, ९३, ९५, ९७, १०३, १०७, १०९, ११०ओबीसी महिला७,८,९, १२, १९, २०, २१, २७, ८१, ८२, १००, १०२, १०४, १०५, १११अनुसूचित जाती महिला१६, ३०, ३२, १०६, १०८अनुसूचित जमाती महिला२५
महापालिकेतही घराणेशाही; ज्येष्ठांना हव्यात जास्त जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 12:01 AM