प्रदूषणाने डोंबिवलीकर गुदमरले

By Admin | Published: January 5, 2016 12:59 AM2016-01-05T00:59:54+5:302016-01-05T00:59:54+5:30

सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली डोंबिवली आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

Pollution caused by Dombivlikar | प्रदूषणाने डोंबिवलीकर गुदमरले

प्रदूषणाने डोंबिवलीकर गुदमरले

googlenewsNext

आकाश गायकवाड,  डोंबिवली
सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली डोंबिवली आता राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. प्रदूषण करण्यात हे शहर देशात चौदावे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाने या बाबतीत निश्चित ठोस उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र,गेल्या तीन वर्षांत डोंबिवलीत प्रदूषण कमी होण्याऐवजी ते वाढल्याचेच सिध्द झाल्याने प्रदूषण रोखण्यात नियंत्रण मंडळ कमी पडल्याचे दिसून येते. हिरवा पाऊस पडूनही परिस्थिती न सुधारल्याने सध्या तरी डोंबिवलीकरांचा जीव गुदमरतो आहे.
डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील ४५० कारखान्यांपैकी २०० कारखाने रासायनिक उत्पादनाशी निगडीत आहेत. प्रक्रि या न करता कारखान्यातील सांडपाणी डोंबिवली औद्योगिक परिसरातील कंपन्यांतून सोडले जाते. त्यातून जलप्रदूषण तर होतेच, पण वायू प्रदूषणही होते. डोंबिवली शहर, ग्रामीण परिसर आणि औद्योगिक भागाला त्याचा फटका बसतो. या विरोधात नागरिकांनी अनेक तक्र ारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्या. पण त्यांच्याकडून दिखाऊ कारवाई होते, असा नागरिकांचा आरोप आहे. ठोस उपाययोजना केली जात नसल्याने त्याचा फायदा घेत अनेक कंपन्या रात्रीच्या वेळेत खुलेआम वायू सोडून देतात. त्यामुळे निवासी विभागातील आजदे गाव, सुदर्शननगर, मिलापनगर, सुदामानगर, घरडा सर्कल, सागर्ली-सागाव, गांधीनगर, टिळकनगर, गोग्रासवाडी, पांडुरंगवाडी, रामचंद्रनगर, पी अँड टी कॉलनी, नांदिवली आदी परिसरात राहणाऱ्यांचा जीव गुदमरतो. कासावीस होतो. दुर्गंधीयुक्त वायुमुळे श्वास घेणे, डोळे जळजळणे, उलट्या होणे, डोकेदुखी इत्यादी तक्र ारी वाढल्या. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद शाळेतील शेकडो विद्यार्थ्यंांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशा प्रकारामुळे शाळा लवकर सोडून देण्याची वेळ आल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
दुर्गंधीयुक्त वायूचा त्रास गेली अनेक वर्षे येथील हजारो रहिवासी अनुभवत आहेत. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जितेंद्र सांगेवार यांच्याकडे नागरिकांनी अनेकवेळा लेखी आणि फोनवर तक्र ारी केल्या. कारवाई करतो, उपाययोजना करतो, असे आश्वासन ते देतात, पण प्रत्यक्षात फरक पडत नाही, असेचे म्हणणे आहे.
केमिकलचा उग्र वास सहन न झाल्याने अखेर नागरिकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्र ारही दाखल केली आहे. तरीही परिस्थिती तशीच असल्याचे म्हणणे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी मांडले. गांधीनगर येथील रहिवासी गिरिजा मराठे यांनीही डोंबिवलीच्या प्रदूषणाविरोधात आवाज उठवून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्र ारी केल्या आहेत. मात्र तेथील अधिकारी कोणताही प्रदूषणाचा त्रास नसल्याचे सांगतात. आम्हालाच खोटे पाडले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी दोन दिवसांपूर्वी २०० ते ३०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्र ार केली. त्याचाही फायदा झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अधिकारी निगरगट्ट असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Pollution caused by Dombivlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.