शहरात प्रदूषण, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 12:46 AM2020-10-31T00:46:41+5:302020-10-31T00:51:23+5:30

Panvel News : पनवेल शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे. याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीच्या धरणाची नितांत आवश्यकता आहे.

Pollution in the city, concern over inadequate water supply, situation in Panvel Municipal Corporation area | शहरात प्रदूषण, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्थिती

शहरात प्रदूषण, अपुऱ्या पाणीपुरवठ्याची चिंता, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्थिती

Next

- वैभव गायकर 
पनवेल : पाच लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या पनवेल महानगरपालिकेला चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. पूर्वाश्रमीची नगरपरिषद, २३ ग्रामपंचायती आणि पाच सिडकोचे नोड एकत्रित करून पालिका स्थापन कारण्यात आली आहे. या पालिकेत सध्याच्या घडीला वाढते प्रदूषण, वाहतूककोंडी, पाणीपुरवठा आदी महत्त्वाच्या समस्या बनल्या आहेत. या व्यतिरिक्त इतरही समस्या आहेत.

पनवेल शहराची व्याप्ती वाढत चालली आहे. झपाट्याने येथील लोकसंख्या वाढत चालली आहे. त्या दृष्टीने वाहनांची संख्या वाढणार आहे. याबाबत पालिकेने आत्ताच नियोजन करण्याची गरज आहे. पालिकेला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने स्वतःच्या मालकीच्या धरणाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या घडीला पालिका सिडको, एमआयडीसी, इमजेपी आदी प्राधिकरणाकडून पाणी घेत आहे. 

 अपुरा पाणीपुरवठा 
पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा करील, असे स्वतःच्या मालकीचे धरण नाही. त्यामुळे दररोज सुमारे ३१० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे.
सिडको क्षेत्रात अद्यापही पाणीपुरवठा सिडको प्राधिकरण करीत आहे. सिडको आणि पालिकेचे अधिकारी  जबाबदारी झटकण्याचे काम करतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. 
-ॲॅड.बाळासाहेब भोजने, खारघर 

वाहतूककोंडीची समस्या
पनवेलमध्ये पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना रस्त्यावर वाहने पार्क करावी लागत आहेत. वाहतूककोंडी नियंत्रित करण्यासाठी पालिका ट्रॅफिक वार्डन नियुक्त करणार आहे. शहरात जास्तीतजास्त पार्किंगची जागा व अंतर्गत रस्त्यांचे नियोजन याबाबत आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. 
-अमित रणदिवे, नागरिक,पनवेल  

कचऱ्याचे ढीग कायम
कचरा, प्रदूषणाची समस्या वाढत चालली आहे. तळोजा एमआयडीसीमधील काही कारखानदार नियमांचे उल्लंघन करत असल्याने, खारघर, कळंबोली, कामोठे, तसेच तळोजा परिसरात नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत पालिकेने पुढाकार घेऊन प्राधिकरणाशी समन्वय साधून प्रदूषण कमी करण्याची गरज आहे. 
-मंगेश रनावडे, नागरिक, खारघर 

घरांचा प्रश्न
पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अद्यापही २९ गावांतील जुन्या व मोडकळीस आलेल्या घरांना पुनर्बांधणीची परवानगी पालिका देत, नसल्याने हजारो ग्रामस्थ पालिकेपुढे हातबल झाली आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात प्राथमिक सुविधांचा आभाव आहे. मोडकळीस आलेली घरे ग्रामीण भागातील नागरिक दुरुस्त करू शकत नाही. यामुळे अपघात होऊ शकतो.
-संतोष तांबोळी, नागरिक, कोपरा गाव 

ड्रेनेजची अडचण
प्रत्येक नोडमध्ये ड्रेनेजची व्यवस्था साफसफाई केली जात नसल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहताना नजरेस पडते.
नागरिकांना समस्या नेमकी   कोणाकडे घेऊन जावे, हा प्रश्न पडतो. ड्रेनेजची साफसफाई व्यवस्थितरीत्या केली जात नसल्याने ड्रेनेजचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहताना दिसते.
-प्रशांत कदम, नागरिक, कळंबोली 

महानगरपालिकेत भाजपची सत्ता
पनवेल महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेल महानगरपालिकेची संकल्पना अस्तित्वात आली होती. महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत भाजपची या ठिकाणी एकहाती सत्ता आहे. शेकाप या ठिकाणी विरोधी पक्षात आहे. असे असले, तरी शहरातील समस्यांकडे बघणे महत्त्वाचे आहे. 

 पालिकेच्या स्थापनेला चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून पालिका क्षेत्रातील समस्या सोडविण्यावर भर दिला आहे. अमृत योजनेमुळे १०० एमएलडी पाणीपुरवठा होणार आहे. या व्यतिरिक्त प्रदूषण, वाहतूककोंडी आदींसह सर्व समस्या सुटण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत.
 - डॉ.कविता चौतमोल, महापौर, पनवेल

Web Title: Pollution in the city, concern over inadequate water supply, situation in Panvel Municipal Corporation area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल