पनवेल : नवीन पनवेलमध्ये हिंदू सेवा समिती, अयप्पा सेवा संघम व जय अंबे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पोंगल महोत्सवाचे आयोजन मागील पाच वर्षांपासून केले जाते. यंदा शुक्रवारी पोंगल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दक्षिण भारतात केरळमधील तिवेंद्रम या ठिकाणी असेलेल्या पार्वती मंदिरात पोंगल साजरा केला जातो. या दिवशी महिला उपवास करत असतात. विशेष म्हणजे, हा उपवास सोडण्यासाठी महिला एका चुल्ह्यावर प्रसाद तयार करत असतात. लाकडाचा वापर करून स्वत: या चुल्ह्यावर तांदूळ व गुळाचे मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर हा नैवेद्य देवीला दाखवून त्याचे प्राशन करून या महिला आपला उपवास सोडत असतात. याकरिता महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करीत असतात. नोकरी कामानिमित्त केरळवरून पनवेल व नवीन पनवेल परिसरात स्थायिक झालेल्या रहिवाशांना हा सण केरळमध्ये जाऊन साजरा करता येत नसल्याने नवीन पनवेलमध्ये हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
नवीन पनवेलमध्ये पोंगल महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:21 AM