नागोठणेत चौरंगी लढतीची शक्यता

By admin | Published: February 13, 2017 05:08 AM2017-02-13T05:08:17+5:302017-02-13T05:08:17+5:30

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे

The possibility of a fourfold match in Nagothane | नागोठणेत चौरंगी लढतीची शक्यता

नागोठणेत चौरंगी लढतीची शक्यता

Next

नागोठणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे के ले आहेत. या मतदारसंघात ११ ग्रामपंचायती येत असून, मतदारांची संख्या २५ हजार ४५७ इतकी आहे. नागोठणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून नरेंद्र जैन, सेनेकडून किशोर जैन, भाजपाकडून अंकुश सुटे, शेकापकडून राजेश सानप, संभाजी ब्रिगेडकडून सुहास येरु णकर यांनी, तर सदानंद गायकर (राष्ट्रवादी काँ.), कार्तिक जैन (शिवसेना) यांनी डमी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यात गायकर आणि कार्तिक जैन आपले अर्ज मागे घेणार असून, राजेश सानपसुद्धा आपला अर्ज मागे घेतील, असे शेकापचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे अंतिम लढत चौरंगी होईल, असे बोलले जात असले, तरी भाजपाचा येथे प्रभाव असतानाही खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जैन उमेदवारांमध्येच होईल असे जाणकारांचे मत आहे. सोमवारी निवडणुकीसाठी कोणते उमेदवार रिंगणात आमने-सामने राहणार याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नागोठणे पंचायत समिती गणातून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे राष्ट्रवादी-शेकाप आघाडीमधून राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे लढत आहेत. सेना-काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असल्याने सेनेचे डॉ. मिलिंद धात्रक आणि काँग्रेसचे संतोष लाड आपले अर्ज मागे घेतील असे स्पष्ट होत आहे. भाजपाने शहरातील एक कडवे कार्यकर्ते मनोज धात्रक यांना उभे केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोळी यांनीसुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे. कोळी राष्ट्रवादीचे डमी उमेदवार असल्याने ते आपला अर्ज मागे घेतील, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे पळसचे माजी सरपंच किसन बोरकर हेसुद्धा अपक्ष या नात्याने मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला अर्ज दाखल केला असल्याचे ते सांगत असल्याने या लढतीत ते राहणार की माघार घेणार? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. विकास चौलकर हे उमेदवारसुद्धा अपक्ष म्हणून या रिंगणात आहेत. या मतदारसंघात नागोठणेसह पळस, कोंडगाव आणि पिगोंडे या चार ग्रामपंचायती येतात. मतदारांची संख्या १२ हजार ५५० इतकी आहे. (वार्ताहर)
ऐनघर पंचायत समिती गणात ऐनघरसह पाटणसई, वांगणी, वरवठणे, भिसे, वणी आणि कडसुरे या सात ग्रामपंचायती येतात. या गणातील मतदारांची संख्या १२ हजार ८७७ इतकी आहे. या गणात सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर हे मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. काँग्रेस-शिवसेना आघाडीतून सेनेचे संजय भोसले आणि शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून शेकापचे भालचंद्र शिर्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापकडून अर्ज दाखल केलेले राजेश सानप आपला अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात येत आहे. सेनेचे सुनील सुटे आणि सोनम भोसले हे दोन डमी उमेदवार असल्याने हे दोन्ही उमेदवार आपला अर्ज मागे घेतील, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या गणात तिरंगी लढत होणार असून भाजपा, शिवसेना आणि शेकापचे हे तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत अटीतटीचीच होईल, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: The possibility of a fourfold match in Nagothane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.