शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

नागोठणेत चौरंगी लढतीची शक्यता

By admin | Published: February 13, 2017 5:08 AM

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे

नागोठणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप या आघाड्यांनी आपले उमेदवार उभे के ले आहेत. या मतदारसंघात ११ ग्रामपंचायती येत असून, मतदारांची संख्या २५ हजार ४५७ इतकी आहे. नागोठणे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून नरेंद्र जैन, सेनेकडून किशोर जैन, भाजपाकडून अंकुश सुटे, शेकापकडून राजेश सानप, संभाजी ब्रिगेडकडून सुहास येरु णकर यांनी, तर सदानंद गायकर (राष्ट्रवादी काँ.), कार्तिक जैन (शिवसेना) यांनी डमी म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यात गायकर आणि कार्तिक जैन आपले अर्ज मागे घेणार असून, राजेश सानपसुद्धा आपला अर्ज मागे घेतील, असे शेकापचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे अंतिम लढत चौरंगी होईल, असे बोलले जात असले, तरी भाजपाचा येथे प्रभाव असतानाही खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जैन उमेदवारांमध्येच होईल असे जाणकारांचे मत आहे. सोमवारी निवडणुकीसाठी कोणते उमेदवार रिंगणात आमने-सामने राहणार याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.नागोठणे पंचायत समिती गणातून आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे राष्ट्रवादी-शेकाप आघाडीमधून राष्ट्रवादीचे शिवराम शिंदे लढत आहेत. सेना-काँग्रेस आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली असल्याने सेनेचे डॉ. मिलिंद धात्रक आणि काँग्रेसचे संतोष लाड आपले अर्ज मागे घेतील असे स्पष्ट होत आहे. भाजपाने शहरातील एक कडवे कार्यकर्ते मनोज धात्रक यांना उभे केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कोळी यांनीसुद्धा आपला अर्ज दाखल केला आहे. कोळी राष्ट्रवादीचे डमी उमेदवार असल्याने ते आपला अर्ज मागे घेतील, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे पळसचे माजी सरपंच किसन बोरकर हेसुद्धा अपक्ष या नात्याने मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपला अर्ज दाखल केला असल्याचे ते सांगत असल्याने या लढतीत ते राहणार की माघार घेणार? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. विकास चौलकर हे उमेदवारसुद्धा अपक्ष म्हणून या रिंगणात आहेत. या मतदारसंघात नागोठणेसह पळस, कोंडगाव आणि पिगोंडे या चार ग्रामपंचायती येतात. मतदारांची संख्या १२ हजार ५५० इतकी आहे. (वार्ताहर) ऐनघर पंचायत समिती गणात ऐनघरसह पाटणसई, वांगणी, वरवठणे, भिसे, वणी आणि कडसुरे या सात ग्रामपंचायती येतात. या गणातील मतदारांची संख्या १२ हजार ८७७ इतकी आहे. या गणात सहा अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजपाचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर हे मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले आहेत. काँग्रेस-शिवसेना आघाडीतून सेनेचे संजय भोसले आणि शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतून शेकापचे भालचंद्र शिर्के निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापकडून अर्ज दाखल केलेले राजेश सानप आपला अर्ज मागे घेतील, असे सांगण्यात येत आहे. सेनेचे सुनील सुटे आणि सोनम भोसले हे दोन डमी उमेदवार असल्याने हे दोन्ही उमेदवार आपला अर्ज मागे घेतील, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या गणात तिरंगी लढत होणार असून भाजपा, शिवसेना आणि शेकापचे हे तीनही उमेदवार तुल्यबळ असल्याने ही लढत अटीतटीचीच होईल, असे बोलले जात आहे. (वार्ताहर)