गोल्फ कोर्सच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्याला पहिल्या टप्प्यातच सामाविण्याची शक्यता

By admin | Published: June 22, 2017 12:31 AM2017-06-22T00:31:09+5:302017-06-22T00:31:09+5:30

खारघर सेक्टर-२२मध्ये सिडकोने आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स प्रकल्प उभारला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या खारघर शहरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी

The possibility of meeting the second stage of the golf course in the first phase | गोल्फ कोर्सच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्याला पहिल्या टप्प्यातच सामाविण्याची शक्यता

गोल्फ कोर्सच्या रखडलेल्या दुसऱ्या टप्प्याला पहिल्या टप्प्यातच सामाविण्याची शक्यता

Next

वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : खारघर सेक्टर-२२मध्ये सिडकोने आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ कोर्स प्रकल्प उभारला आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या खारघर शहरातील सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या पायथ्याशी हा प्रकल्प सिडकोने उभारला आहे. १०३ हेक्टरमधील या प्रकल्पांतर्गत विविध कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी गोल्फ खेळण्यासाठी ९ होल व आकर्षक परिसर विकसित करण्यात आला आहे. वनविभागाच्या अडथळ्यामुळे दुसऱ्या टप्प्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले असल्याने सुमारे १०३ हेक्टरमध्ये वसलेल्या दुसऱ्या टप्प्याला पहिल्या टप्प्यातच सामावून घेण्याची शक्यता आहे. गोल्फ दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या क्लब हाउसच्या अंतर्गत कामाचे उद्घाटन दि. २० रोजी सिडकोचे प्रशासक सीताराम रोकडे यांच्या हस्ते पार पडले.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या गोल्फ कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ५० कोटी ३५ लाख रु पये खर्च करण्यात येणार आहे. एकूण १८ होल असलेल्या या प्रकल्पात पहिल्या ९ होलचे काम पूर्ण झाले आहे.
भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा खेळविण्यात येण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्याचा काही भाग वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. अनेक वर्षांपासून वनविभागाच्या विविध परवानग्यांमध्ये या प्रकल्पाचा दुसरा टप्पा रखडला आहे. गोल्फ कोर्सचा सध्याचा परिसर सुमारे १०३ हेक्टरचा असल्याने सिडको या जागेतच दुसरा टप्पा सामावणार असल्याची शक्यता आहे.
सूत्रांनीदेखील तशी माहिती दिल्याने दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही लवकरात लवकर सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष गोल्फ कोर्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा क्लब हाउसअंतर्गत कामाला सुरु वात झाली असून, तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती खारघर सिडकोचे प्रशासक सीताराम रोकडे यांनी दिली. या वेळी सिडकोचे अधिकारी जी. दलाल हेदेखील उपस्थित होते. या क्लबमध्ये गोल्फ खेळणाऱ्या खेळाडूंसाठी विश्रामगृह, अद्ययावत हॉटेल, कॅन्टीन आदींचा समावेश असणार आहे. या क्लब हाउसच्या उभारणीला सुमारे २.९ करोड रु पये खर्च येणार आहे.
श्रीमंतांचा खेळ समजला जाणारा हा खेळ खेळण्यासाठी सुमारे ८०० ते १२०० रुपये खर्च येतो. तसेच खेळाडूंच्या मागणीनुसार ट्रॉली, गाडी तसेच खेळोपयोगी सामान खेळाडूंना दिले जाते. प्रकल्प पूर्णत्वाला आला नसल्याने या ठिकाणी अद्याप एकही स्पर्धा खेळविली गेली नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धांसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा खेळविल्या जाणार आहेत.

Web Title: The possibility of meeting the second stage of the golf course in the first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.