नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्येही उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण होऊ लागले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून प्रत्येक नागरिकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आपत्कालीन विभागाने केले आहे.शहरामधील तापमान सरासरी ३३ डिग्रीपर्यंत गेले आहे. पुढील एक महिन्यामध्ये त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता निर्माण झालीआहे.इमारतींची वाढती संख्या व रोडचेही झालेले काँक्रीटीकरण यामुळे तापमानामध्ये भर पडत आहे. आयटी पार्कसह इतर इमारतींना लावण्यात येणारे काचेचे आवरण यामुळेही तापमान वाढत आहे.उरण परिसरामध्ये कंटेनर यार्डचा परिणाम उष्णता वाढण्यावर होत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कष्टाची कामे करणारे माथाडी कामगार,घरोघरी जाऊन मार्केटिंगचे काम करणारे कर्मचारी व रोडवर उन्हात उभे राहून नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना उन्हाचा त्रास होत आहे. अनेकांना उन्हामुळे चक्कर येण्याच्या घटनाही घडत आहेत. त्वचेचे विकारही होऊ लागले आहेत. उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घ्यावी अशा सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.उकाड्यापासून वाचण्यासाठी नागरिक उद्यान, मॉल व इतर ठिकाणांचा आश्रय घेत असल्याचे चित्र शहरामध्ये दिसू लागले आहे. दुपारी मॉलमध्ये क्षणभर वातानुकूलित यंत्रणेमध्ये घालविण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. रोडवरील रसवंतीगृहेही नागरिकांना दिलासादायक वाटू लागली आहेत. पुढील एक महिना उष्णतेचा त्रास होणार असून या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काय करावे?तहान लागली नसली तरी जास्त पाणी प्यावेघराबाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलांचा वापर करण्यात यावाशरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, लस्सी, लिंबू पाणी, ताक याचा नियमित वापर करावापहाटेच्या व सायंकाळच्या वेळेत जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावाउष्माघातापासून वाचण्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यादुपारी १२ ते ३.३० या कालावधीमध्ये उन्हात बाहेर जाणे टाळावेगडद, घट्ट व जाड कपडेघालण्याचे टाळावेबाहेर तापमान अधिक असल्यासशारीरिक श्रमाची कामे टाळावीत,लहान मुलांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये
उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:36 AM