सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली टपाल कार्यालयातील कर्मचारी अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. गेल्या २७ वर्षांपासून वापरात असलेली जागा, सध्याची कर्मचारी संख्या व वाढत्या टपालाच्या तुलनेत अपुरी पडत आहे. तर जीर्ण झालेल्या बांधकामामुळे कर्मचाऱ्यांसह तिथे येणाऱ्या नागरिकांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऐरोली सेक्टर १७ येथील सिडकोनिर्मित वाणिज्य संकुलातील दोन गाळ्यांमध्ये ऐरोलीच्या टपाल कार्यालयाचे कामकाज चालत आहे. साधारण १९९२ साली सिडकोने पोस्टाला ही जागा भाडेतत्त्वावर दिलेली आहे. त्या वेळी अवघे पाच कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत होते. मात्र, सध्या २० हून अधिक कर्मचारी कार्यालयात कार्यरत आहेत. तर ऐरोली नोडमध्ये समाविष्ट होणाºया ऐरोलीसह दिवा, दिघा ते विटावा नाकापर्यंतचे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक बँका व महत्त्वाची कार्यालये असून, त्यांचे महत्त्वाचे दस्तावेज अद्यापही भारतील पोस्टाद्वारेच येत असतात. त्यानुसार ऐरोली टपाल कार्यालयातून प्रतिदिन सुमारे दीड ते दोन हजार टपालांची आवक-जावक होत असते. त्यापूर्वी टपाल हाताळणीचे काम करताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्या भेडसावत आहेत.
सुमारे २७ वर्षांपूर्वी टपाल विभागने सिडकोकडून भाड्याने घेतलेल्या जागेची वेळोवेळी डागडुजी झालेली नाही, यामुळे प्रतिवर्षी पावसाळ्यात छतामधून पाणी ठिपकत असते. यामुळे नागरिकांचे महत्त्वाचे टपाल भिजून खराब होण्याची शक्यता असते. कर्मचाºयांनीच कार्यालयाच्या छतावर प्लॅस्टिकचे आवरण टाकून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे. मात्र, जागोजागी पडलेल्या भेगांमधून छत कोसळण्याची भीती असून त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. तर उपलब्ध जागेतच स्वच्छतागृह आहे. त्याच्या दरवाजासमोरच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. बाजूलाच कर्मचाºयांच्या बैठकीची सोय असल्याने महिलांना स्वचछतागृहाचा वापर करतानाही अवघडल्यासारखे होते.
२० हून अधिक कर्मचारी एका वेळी तिथे बसू शकतील, एवढीही जागा तिथे नाही. यामुळे एकाचे काम संपल्यानंतर दुसºयाला टेबलवर ताबा मिळवून टपाल सॉर्टिंगचे काम करावे लागत आहे. याचा परिणाम कर्मचाºयांच्या वेळेच्या नियोजनावर होत आहे. विविध कामानिमित्ताने पोस्ट कार्यालयात ये-जा करणाºयांनाही रांगेत उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात अनेकांनी टपाल कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यानंतरही टपाल कार्यालयातील गैरसोयींकडे दुर्लक्ष होत आहे. टपाल कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीसाठी ऐरोली सेक्टर १८ येथेच १ क्रमांकाचा भूखंड मिळालेला आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून हा भूखंड वापराविना पडून आहे. यामुळे त्यावर झोपड्यांचेही साम्राज्य निर्माण झाले होते. या संदर्भात ज्येष्ठ नागरिक उमाकांत पाठक व शंकर मनगांवकर यांनी सातत्याने तक्रारी केल्यानंतर भूखंड मोकळा करून त्याला कुंपण घालण्यात आले आहे. मात्र, अद्यापही तो वापरात नसल्याने त्यावर झुडपे व गवतांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी कामकाजाच्या निरीक्षणासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी ऐरोली टपाल कार्यालयाला भेट दिली होती. या वेळी त्यांनाही बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली नव्हती. मात्र, या संदर्भात ऐरोली टपाल कार्यालयाचे अधिकारी विजय घाडगे यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला.
अपुºया जागेची गैरसोयअपुºया जागेअभावी टपाल कार्यालयात अधिकाºयांसह कर्मचाºयांना अंग चोरून बसावे लागत आहे. तर उपलब्ध पाच ते सहा टेबलवर एकाचे काम संपल्यानंतर दुसºयाला कामाची संधी मिळत आहे. अशातच नागरिकांचे टपाल ठेवायचे कुठे? असाही प्रश्न त्यांना सतावत आहे. यामुळे जागोजाटी टपालांचे ढीग रचल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
ऐरोली टपाल कार्यालयात अपुºया जागेअभावी तसेच धोकादायक स्थितीतील बांधकामामुळे कर्मचाºयांसह नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या जागेत वेळीच नवे स्वतंत्र टपाल कार्यालय उभारले जाणे गरजेचे आहे; परंतु चार वर्षांपासून या संदर्भात पनवेल ते दिल्लीपर्यंतच्या पोस्टाच्या अधिकाºयांकडे पत्रव्यवहार करूनही ठोस उत्तर मिळालेले नाही.- उमाकांत पाठक, ज्येष्ठ नागरिककाही कामानिमित्ताने ऐरोलीच्या टपाल कार्यालयात गेल्यास दयनीय दृश्य नजरेस पडते. कर्मचाºयांना बसण्यासाठी तसेच टपाल ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते इतरत्र पसरल्याचे पाहायला मिळत आहे. तर नागरिकांनाही चौकशीकरिता थांबण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने स्वतंत्र जागेत पोस्टाचे कार्यालय सुरू होण्याची गरज आहे.- राहुल देशमुख, रहिवासी