अंबानी रुग्णालयाबाबतची पोस्ट व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 02:57 AM2017-08-14T02:57:26+5:302017-08-14T02:57:50+5:30
खालापूर तालुक्यातील अंबानी रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात मश्गूल झाल्याचे दिसून येते.
आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : सरकारी रुग्णालयाची प्रचंड दुरवस्था झाली असताना दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक खालापूर तालुक्यातील अंबानी रुग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात मश्गूल झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे अंबानी रुग्णालयाची चौकशी करण्याबाबतची पोस्ट त्यांनीच सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. डॉ.गवळी यांनी व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर चौकशीबाबतचा अहवाल आणि काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा रुग्णालयाची झालेली दुरवस्था आधी बघा, त्यानंतर दुसºया रुग्णालयाची चौकशी करा, अशा प्रतिक्रि या उमटल्या आहेत.
अलिबाग येथे जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. याच रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी तब्बल १० कोटी रुपये खर्च करून त्याचे रुपडे पालटण्याचा प्रयत्न सुरू आहे. नूतनीकरणावर १० कोटी रु पये खर्च हे थोडे जास्तीच वाटत असल्याने तेवढ्या निधीमध्ये नवीन रुग्णालय बांधून झाले असते, अशा प्रतिक्रि या मध्यंतरी जनसामान्यांमध्ये उमटल्या होत्या. कोट्यवधी रुपये खर्चूनही रुग्णालयाची बकाल अवस्था झाली आहे. इमारतीला गळती लागली आहे, तर प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. उघड्या नाल्यांमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लिफ्ट बंद असल्याने रु ग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीला काही ठिकाणी शेवाळ लागले आहे. काही मजल्यांवर तर झाडेही उगवली आहेत. शवागृहाचे छप्पर गळत असल्याने त्याला चक्क मेनकापडाचे आच्छादन लावण्यात आले आहे. शवागृहामध्ये शीतपेटी नसल्याने मृत पावलेल्या रुग्णाची हेळसांड होत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली
आहे.
काहीच दिवसांपूर्वी औषध भांडार गृहामध्ये गळती झाल्याने शेकडो औषधांचे बॉक्स भिजले होते. रुग्णालयाच्या परिसराचीही योग्य प्रकारे साफसफाई होत नसल्याने रुग्णालयाला बकाल स्वरूप आल्याचे दिसून येते.
रु ग्णालयाकडे कमी मनुष्यबळ असल्याने थोड्याफार प्रमाणात अडचणी निर्माण होतात, परंतु त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम होऊ दिला जात नाही. शवागृहाचे काम प्रगतिपथावर आहे. अंबानी रु ग्णालय हे सीएसआरमधून चालवले जाते. तेथे अनागोंदी कारभार होत असल्याच्या नागरिकांच्याच तक्र ारी आहेत.
-डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्यचिकित्सक
रु ग्णालयामध्ये मुख्य दारातून प्रवेश करताना रँप नसल्याने उपचारासाठी येणाºया रु ग्णांना विशेष करून वयोवृद्ध आणि गरोदर स्त्रियांना त्याचा अधिक त्रास होतो. याच्यासह अन्य गैरसोयी असताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी हे खालापूर तालुक्यातील अंबानी रु ग्णालयाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यासाठी जातात. हा फार मोठा विरोधाभास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता ढवळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रु ग्णालयात आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. तेथे डॉक्टर उपलब्ध असणे, रु ग्णासह त्यांच्या नातेवाइकांशी आदराने बोलणे, स्वच्छता असणे या गोष्टी असणे अत्यंत महत्त्वाच्या आहे, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले.
ज्या कॅम्पसमध्ये स्वत: डॉ.गवळी बसतात त्यांना या गोष्टी दिसत नाहीत हे नवलच म्हणावे लागेल. असे असताना ते दुसºया रु ग्णालयाची चौकशी करतात. त्यांनी ते जरूर करावे, परंतु आपल्याकडे काय चालले आहे याच्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा
रु ग्णालयाच्या दुरवस्थेबाबत राष्ट्रवादी लवकरच डॉ.गवळी यांची भेट घेणार असल्याचेही ढवळे यांनी सांगितले.